अंकाई ता.येवला येथील किल्ल्यावर कावड यात्रेसाठी पाणी घेण्यासाठी आलेल्या शिर्डी जवळील पिंपरी लोकाई येथील तरुणाचा तळ्यातील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या बाबत ची अधिक माहिती अशी की शिर्डी जवळ असलेल्या पिंपरी लो या गावातील दहा ते पंधरा जण आंकाई येथील किल्ल्यावर गुरुवार ३ मार्च ला सकाळी गावातील कावड यात्रेसाठी तळ्यातील पाणी घेण्यासाठी आले होते. अशोक कानकुटे या ३५ वर्षीय तरुण पाणी घेण्यासाठी तळ्यात उतरला असता त्याचा पाय घसरून तो पाण्यात बुडाला दुर्दैवाने त्याला पोहता येत नसल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
भुमी क्रिकेट अकॅडमीतील सुयश पवार , हसनेन शेख , खुशाल परळकर , गौरव निते व सौरभ चव्हाण यांची नाशिक जिल्हा क्रिकेट आसोसिएशन 14 वर्षातील संघाच्या संभाव्य खेळाडु यादित निवड.
महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने ) नाशिक...









