Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मराविमं अधिकारी संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर;अध्यक्षपदी प्रवीण बागूल, सरचिटणीसपदी संजय खाडे

Mar 4, 2022

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी संघटनेचे ४४ वे वार्षिक अधिवेशन पुणे येथे नुकतेच पार पडले. यात संघटनेची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. संघटनेच्या अध्यक्षपदी प्रवीण बागूल यांची तर सरचिटणीसपदी संजय खाडे यांची निवड करण्यात आली.
उर्वरित कार्यकारिणी : संघटन सचिव – प्रवीण काटोले, कार्याध्यक्ष – किशोर बागूल (महावितरण), मंगेश शिंदे (महापारेषण), नंदकिशोर पांडे (महानिर्मिती), उपसरचिटणीस – प्रणेश शिरसाठ (महावितरण), सतीश जाधव (महापारेषण), धीरज विसपुते (महानिर्मिती), कोषाध्यक्ष – तुषार खैरनार, महिला प्रतिनिधी – मंजुषा दुसाने (क्षेत्रीय कार्यालय), स्मिता बडे (सांघिक कार्यालय).
नवनिर्वाचित सरचिटणीस संजय खाडे म्हणाले की, महावितरण, महापारेषण व महानिर्मिती व सूत्रधारी कंपनी अंतर्गत वित्त व लेखा, मानव संसाधन, माहिती व तंत्रज्ञान, औद्योगिक संबंध, जनसंपर्क, विधी, सुरक्षा व अंमलबजावणी आदी विभागातील अधिकाऱ्यांचे ही संघटना प्रतिनिधित्व करते. तिन्ही वीज कंपन्यांतील अतांत्रिक अधिकाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी नवीन कार्यकारिणी अधिक जोमाने प्रयत्न करणार आहे. यात अधिकाऱ्यांचे वर्क नॉर्म्स निश्चित करणे, सर्व अतांत्रिक अधिकार्‍यांच्या रखडलेल्या पदोन्नती पॅनलबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करणे, वरिष्ठ व्यवस्थापक (मानव संसाधन) वेतननिश्चितीमधील तफावत दूर करणे, जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या अपग्रेडेशनबाबत प्रश्न निकाली काढणे, अंतर्गत भरती प्रक्रिया पुन्हा राबविण्याबाबत उपाययोजना करणे, लेखापरीक्षण पूर्वीप्रमाणेच लेखा विभागामार्फत सुरू करणे, महावितरण कंपनीस आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रशासनास सर्वोतोपरी मदत करणे, वीज उद्योगास खाजगीकरणापासून रोखणे आदी उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून येणाऱ्या काळामध्ये कामकाज करण्याचा मानस आहे, असे सरचिटणीस संजय खाडे यांनी सांगितले.

अजून बातम्या वाचा..

(बघा व्हिडिओ) शिवसेना सहसंपर्क प्रमुख अल्ताफ खान यांनी दिली चांदीची गणेश मूर्ती भेट

(बघा व्हिडिओ) शिवसेना सहसंपर्क प्रमुख अल्ताफ खान यांनी दिली चांदीची गणेश मूर्ती भेट

मनमाड शहरातील सावरकर नगर मधील हूडकोचा राजा गणेश मंडळातील कार्यकर्त्यांचे उत्कृष्ट कार्य लक्षात...

read more
नांदगाव तालुक्यातील मांडवड येथे राष्ट्रीय पक्षी मोरा ला प्राणीमित्र विजय बडोदे यांनी दिले जीवदान

नांदगाव तालुक्यातील मांडवड येथे राष्ट्रीय पक्षी मोरा ला प्राणीमित्र विजय बडोदे यांनी दिले जीवदान

नांदगाव ( सोमनाथ घोंगाणे): तालुक्यातील मांडवड येथे भास्कर आहेर यांच्या घरा जवळ कोरड्या विहिरी...

read more
(बघा व्हिडीओ) आ. कांदे यांनी स्वखर्चातून उपलब्ध करून दिलेल्या रुग्णवाहिकांचे लोकार्पण

(बघा व्हिडीओ) आ. कांदे यांनी स्वखर्चातून उपलब्ध करून दिलेल्या रुग्णवाहिकांचे लोकार्पण

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या स्वखर्चातून मतदार संघातील जनतेसाठी दोन ॲम्बुलन्स उपलब्ध करून...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]