Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सेंट झेवियर हायस्कूल मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

Mar 5, 2022

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे माननीय मुख्याध्यापक फादर सॅबी कोरिया हे होते. याप्रसंगी माननीय पर्यवेक्षिका सिस्टर शैला, फादर लॉईड, इयत्ता दहावी अ चे वर्ग शिक्षक श्री. अनिल निकाळेसर, दहावी ब चे वर्ग शिक्षक श्री. केशव आचारेसर, ज्येष्ठ शिक्षिका सौ. प्रियंका साळी मॅडम, दहावी अ, ब चे मॉनिटर्स आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हुमरा पटेल व सायली चकोर यांनी केले. तर आभार प्रदर्शन कु. आयुष बोराडे याने केले. याप्रसंगी कु.कुणाल शिरसाठ,कु.प्रांजली आहिरे, कु.विनय आहिरे या विद्यार्थ्यांची भाषणे झालीत तर शाळेचे मा.मुख्याध्यापक फा. सॅबी कोरीया व दहावीचे वर्ग शिक्षक श्री. अनिल निकाळे सरांनी विद्यार्थ्यांना भावी शैक्षणिक वाटचालीबाबत मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्यात.शालेय गायकवृंदाने, ‘चलते चलते ये मेरे गीत याद रखना’ हे गीत सादर करून वातावरण भावविभोर केले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा तर्फे सावकारी पध्दतीने वीज बिल वसूली करणाऱ्या वीज वितरण कंपनी विरोधात आंदोलनाचा इशारा

मनमाड शहर भाजपा तर्फे सावकारी पध्दतीने वीज बिल वसूली करणाऱ्या वीज वितरण कंपनी विरोधात आंदोलनाचा इशारा

मनमाड शहरात वीज वितरण कंपनी द्वारे गेल्या दोन दिवसांत वीज ग्राहकांन कडून सावकारी पध्दतीने वीज बिल...

read more
रोटरी क्लब व भूमी क्रिकेट क्लब आयोजीत अंडर 17 बॉक्स टर्फ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

रोटरी क्लब व भूमी क्रिकेट क्लब आयोजीत अंडर 17 बॉक्स टर्फ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

बुधवार २३ फेब्रुवारी रोजी येथील रोटरी क्लब मनमाड आणि भूमी क्रिकेट क्लबच्या संयुक्त विद्यमाने मनमाड...

read more
एम सलीम अहमद यांची ग्रंथालय महासंघ नाशिक जिल्हा अध्यक्षपदी निवड, मनमाड शहर सामाजिक संघटनांतर्फे सत्कार

एम सलीम अहमद यांची ग्रंथालय महासंघ नाशिक जिल्हा अध्यक्षपदी निवड, मनमाड शहर सामाजिक संघटनांतर्फे सत्कार

मराठी भाषा सार्वजनिक ग्रंथालय चे नेतृत्व करणारी सामाजिक संघटना राज्य ग्रंथालय महासंघ महाराष्ट्र या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]