Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

धाडसी चोरीच्या घटनेने मनमाड शहरात खळबळ

Feb 23, 2022

धाडसी घरफोडीच्या घटनेने मनमाड शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

मनमाड शहराच्या मध्यवर्ती भागात पोस्ट ऑफिस जवळील बुरहानी पार्क येथे एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा दोन लाख 71 हजार 980 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे .तसेच ही घटना ताजी असतानाच मंगळवारी मध्यरात्री मनमाड शहराचा मेन रोड परिसरात दोन दुकानांचे शटर उचकटून धाडसी चोरीचा प्रयत्न झाला.

याबाबतची माहिती अशी की मनमाड शहर पोस्ट ऑफिस शेजारी बुरहानी पार्क येथे घरफोडीची घटना घडली .अज्ञात चोरांनी फिर्यादीच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला व लाकडी कपाटाचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने सोन्याचा हार कानातील रिंग, तीन अंगठ्या व 65 हजार रुपये रोख असा एकूण दोन लाख 71 हजार 980 रुपये किमतीचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला. याप्रकरणी मनमाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रभारी निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे इब्रार इसरईल खान ( वय 32 धंदा व्यवसाय राहणार बुरहानी पार्क मनमाड पोस्ट ऑफिस) यांनी या घटनेची फिर्याद दिली आहे याप्रकरणी मनमाड पोलिसांनी भादवि 380,454,34 अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना ताजी असतानाच मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास मनमाड शहरात मेन रोड असलेल्या नेहरू रोड वरील एक मेडिकल दुकान एक रेडिमेड कपड्यांच्या दुकानात चोरीचा प्रयत्न केला मात्र चोरांच्या हाती फारसे काही लागले नाही भर रस्त्यावर झालेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे पोलिसांनी रात्रीची गस्त अधिक कडक करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे

 

अजून बातम्या वाचा..

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

मनमाड- शहरातील अत्यंत गजबजलेल्या विवेकानंद नगर दोन परिसरात राहणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]