
मनमाड नगरपरिषद व पंचायत समिती, नांदगाव यांचेमार्फत संयुक्तिक पणे संपूर्ण शहरात फिरत्या वाहनाद्वारे कोविड लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे.
दि. ७ ते १२ मार्च २०२२ याकालावधीत शहरातील विविध प्रभागात फिरते वाहनाव्दारे कोविड लसीकरणाचा १ ला, २ रा आणि बूस्टर डोस देण्यात येणार आहे.
तरी शहरातील नमुद प्रभागातील नागरिक यांनी लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा.
सोबत- प्रभागातील लसीकरण माहीती तक्ता.
प्रशासक तथा मुख्याधिकारी
मनमाड नगरपरिषद, मनमाड
तालुका आरोग्य अधिकारी
पंचायत समिती, नांदगाव









