loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १० मार्च २०२१ !

Mar 10, 2022


मेष :- नवीन नोकरीसाठी विचारणा होईल. आपले ध्येय गाठण्यासाठी हर संभव प्रयत्न करा.

वृषभ :- स्वप्नातून बाहेर येऊन कामाला लागा. व्यापारा निमित्त केलेले प्रवास लाभदायक ठरतील. फसवणुकीपासून सावध राहावे.

मिथुन :- धाकट्या भावंडांना मदत कराल. अपेक्षित कमाईची कामना मनात बाळगाल.

कर्क :- जोडीदाराविषयी नाराजी चटकन दर्शवू नका. पैशाची गुंतवणूक योग्य प्रकारे करा. क्षुल्लक मतभेद होण्याची शक्यता.

सिंह :- कामात नवीन अधिकार हाती येतील. हातातील कलेचे कौतुक होईल. छंद जोपासायला वेळ काढाल.

कन्या :- दानधर्म होईल. घरातील वातावरण आनंदी राहील. आपले विचार खुलेपणाने मांडाल. गायन कलेला चांगला वाव मिळेल.

तूळ :- मनात योजलेले काम पूर्ण कराल. समस्यांचे निराकरण होऊ शकेल. घरासाठी पैसे खर्च कराल.

वृश्चिक :- पराक्रमाला चांगला वाव मिळेल. द्विधा मन:स्थितीत कोणताही निर्णय घेऊ नका.

धनू :- समोरच्या व्यक्तिला शब्द देताना सावध रहा. संमिश्र घटना जाणवू शकतात. जुने मित्र भेटतील.

मकर :- घरासंबंधी कामात कौटुंबिक सदस्यांची मते विचारात घ्या. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. 

कुंभ :- समोरच्या व्यक्तिला विश्वासात घेऊन काम करा. मिळालेल्या संधीचे सोने करावे. मोठ्या खर्चावर नियंत्रण ठेवा.

मीन :- समोरच्यावर संपूर्ण विश्वास टाकू नका. व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्तींना अचानक धनलाभ संभवतो. अनेक दिवस अडून राहिलेले काम पूर्ण होईल.


अजून बातम्या वाचा..

.