Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

रोटरी महिला क्लब व ईगल फिटनेस क्लब मनमाड यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिना निमित्त PCOS & PCOD व आरोग्य विषयक जागरूक व्याख्यान संपन्न

Mar 11, 2022

संपूर्ण जगभरात ०८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. ह्याच दिनाचे औचित्य साधून रोटरी महिला क्लब व ईगल फिटनेस क्लब यांनी ईगल फिटनेस क्लब येथे महिलांसाठी आरोग्य विषयक व्याख्यान आयोजित केले होते . डॉ. पूनम राजपूत व डॉ. सोनाली पाटील यांनी उपस्थित महिलांना आरोग्य विषयक माहिती देऊन सध्याच्या धावपळीच्या जीवनात आपले आरोग्य व स्वतःला फिट कसे ठेवावे ह्या बद्दल मार्गदर्शन केले तसेच बदलत्या जीवन शैली चे शरीरावर होणारे परिणाम व संतुलित आहार ह्यावर व्याख्यान झाले . व्याख्यान ना नंतर ईगल फिटनेस क्लब येथे सॅनिटरी पॅड च्या बॉक्स चे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले . हे सॅनिटरी पॅड बॉक्स कायम स्वरुपी येथे बसवण्यात येणार आहे . ह्या उपक्रमाबद्दल उपस्थितीत महिला व प्रमुख व्यक्त्यानी ह्या उपक्रमाचे कौतुक केले . कार्यक्रमास रोटरी महिला क्लब अध्यक्ष सौ. आरती शर्मा , सचिव सौ. खुशी शर्मा , खजिनदार सौ . मयुरी काकडे , सदस्य सौ. रवींद्र कौर कांत , सौ . लीला सदगिर सौ. पूर्णिमा माने , सौ. निधी शर्मा व ईगल फिटनेस क्लब चे संचालक सर्वेश विनय गरुड व ईतर टीम अभिनय गरुड, स्वाती आहेर, श्वेताली कांबळे उपस्थित होते .

कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोटरी महिला क्लब व ईगल फिटनेस क्लब च्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले .

अजून बातम्या वाचा..

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड, दि. २५ एप्रिल २०२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा...

read more
पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

दिनांक २२/०४/२०२५ रोजी जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाममधिल बैसरण येथे विदेश.देशभरातिल राज्यातून...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]