loader image
[ays_poll id=7]

चांदवड तंत्रनिकेतनमध्ये जागतिक महिला दिन साजरा

Mar 11, 2022

चांदवड येथील श्री नेमीनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित श्री एच. एच. जे. बी. तंत्रनिकेतनात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.

या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाकरीता चांदवडच्या नायब तहसीलदार डॉ.सौ.मिनाक्षी भगीरथ गोसावी व सौ. कल्याणी सचिन कुलकर्णी (वकील, चांदवड कोर्ट) प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन तंत्रनिकेतनमध्ये कार्यरत असलेल्या अंतर्गत तक्रार समितीद्वारे करण्यात आले. या प्रसंगी चांदवडच्या नायब तहसीलदार डॉ.सौ.मिनाक्षी भगीरथ गोसावी बोलतांना, त्यांनी महिला कर्मचारी आणि विद्यार्थिनींना “शाश्वत उद्यासाठी आज लैंगिक समानता” या विषयावर मार्गदर्शन केले. समानता केवळ पुरुषांनीच नव्हे तर स्त्रियांनीही समजून घेतली पाहिजे. समानता हा शब्द आपण अगदी सहज वापरतो, पण आपल्या वागण्यात तो सहजासहजी येत नाही,असे त्यांनी संबोधित केले.त्याचप्रमाणे संस्थेत मुलींसाठी पोस्टर, रांगोळी आणि महिला सक्षमीकरण आणि लैंगिक समानता या विषयावर भाषण स्पर्धा आयोजित केल्या तसेच विजेत्यांचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी अंतर्गत तक्रार समिती अध्यक्ष ,अधीव्याख्याता सौ .नीरजा प्रसाद यांनी तुमचे बोल आम्हास खूप प्रेरणादायी आणि प्रभावी ठरतील, या शब्दात प्रमुख पाहुण्यांचे आभार व्यक्‍त केले. तसेच अधीव्याख्याता कु. ए. एस. चोरडिया, सौ . ए. एस. माळी, कु. आर.आर.सोनवणे, सौ .के.एस.सोनवणे ,सौ .यू.एस.काळे यांचे मोलाचे साह्य लाभले. सर्व विभागाचे विभाग प्रमुख, सहकारी व तंत्रनिकेतनाचे प्राचार्य डॉ. व्ही.ए. वानखेडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. विश्वस्त समितीचे अध्यक्ष मा.श्री बेबीलालजी संचेती व विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष मा. श्री दिनेशजी लोढा, मानद सचिव मा.श्री जवाहरलालजी आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष मा.श्री अजीतकुमारजी सुराणा, प्रबंध समितीचे उपाध्यक्ष आणि तंत्रनिकेतनाचे समन्वयक श्री अरविंदकुमारजी भन्साळी, सह मानद सचिव मा.श्री. झुंबरलालजी भंडारी व तंत्रनिकेतनाचे मुख्य समन्वयक तथा प्रबंध समिती सदस्य, श्री राजेद्रकुमारजी बंब यांनी या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल सर्वांचे अभिनंदन केले .

अजून बातम्या वाचा..

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
.