Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

डॉ. सुधीर शेतकर अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये वरिष्ठ इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून रुजू

Mar 12, 2022

डॉ. सुधीर शेतकर यांनी नवी दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, ( AIIMS ) या सर्वोच इन्स्टिट्यूट मधून कार्डिओलॉजी या विषयात पदवीत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल नाशिक येथे, डॉ सुधीर शेतकर हृदयरोग विभाग प्रमुख व वरिष्ठ इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून पूर्ण वेळ कार्यरत असणार आहे.

डॉ सुधीर शेतकर नाशिक जिल्यातील सुप्रसिद्ध इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट आहेत त्यांना १२ वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे. त्यांनी आपल्या अनुभवातून अनेक अवघड हृदय विकार रुग्णांनावर यशस्वी उपचार केले आहेत आणि यासोबतच जनसामान्य मध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. डॉ सुधीर शेतकर यांनी आतापर्यन्त आतंरराष्ट्रीय स्तरावर हृदयसंबधीत वेगवेगळ्या विषयांवर संशोधनात्मक प्रबंध सादर केले आहेत. तसेच आजतागायत त्यांनी १२००० पेक्षा जास्त रुग्णांची रेडियल अँजिओग्राफी / अँजिओप्लास्टी / गुंतागुंतीची अँजिओप्लास्टी केली आहे. २०० पेक्षा अधिक रुग्णांना एफएफआर/आयव्हीयुएस / ओसीटी या अत्यधुनिक तंत्रज्ञानाद्वारे त्यांनी योग्य निदान करून रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. याच प्रमाणे बऱ्याच रुग्णांना कार्डियाक रिदम डिसऑर्डर ( पेसमेकर / एआयसीडी ) या स्वरूपाचे यंत्र बसून हृदयरोग्यांना नवं संजीवनी दिली आहे. हार्ट फेल्युअर मॅनेजमेंट आणि कार्डियाक ट्रान्सप्लांट, नॉन इनवेसिव्ह कार्डिओलॉजी क्लिनिकल कार्डिओलॉजी या सर्वां मध्ये ते अत्यंत निपुण आहेत.रुग्णाला सर्वोत्तम रुग्ण सेवा देण्यासाठी ते उत्तर महाराष्ट्रासह भारतात सुद्धा ओळखले जातात

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – येवला येथे मद्यधुंद वाहन चालकाने अनेक वाहनांना चिरडले – एका युवकाचा मृत्यू

बघा व्हिडिओ – येवला येथे मद्यधुंद वाहन चालकाने अनेक वाहनांना चिरडले – एका युवकाचा मृत्यू

मंगळवारी एका मद्यधुंद वाहन चालकाने कोपरगाव ते मनमाडचे दिशेने जाताना अनेक वाहनांना धडक देत झालेल्या...

read more
रेल्वे अपघातात मृत्यमुखी पडलेल्या चार कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना एन.आर.एम.यु तर्फे प्रत्येकी एक लाखाची मदत

रेल्वे अपघातात मृत्यमुखी पडलेल्या चार कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना एन.आर.एम.यु तर्फे प्रत्येकी एक लाखाची मदत

पुसलेल्या कुंकूवाचं मोल आम्ही काय करणार ? मदत नव्हे जगण्याला बळ देण्याचा अल्पसा प्रयत्न ....! 13...

read more
बघा व्हिडिओ – सोशल मीडियावर सध्या एका झेलचीच चर्चा – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी घेतली दखल

बघा व्हिडिओ – सोशल मीडियावर सध्या एका झेलचीच चर्चा – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी घेतली दखल

सोशल मीडियावर सध्या एका झेलची चर्चा होत आहे. सचिन तेंडुलकरसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनाही या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]