Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

पुतळा जीर्णोध्दार व शिवस्फूर्ती स्मारक नूतनीकरण सोहळा जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न

Mar 14, 2022

नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून शहरातील शिवस्फूर्ती मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याचे नूतनीकरण व अनावरण सोहळा काल मोठ्या दिमाखात संपन्न झाला या सोहळ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज खासदार संभाजी राजे छत्रपती यांच्या हस्ते आज शिवस्फूर्ती मैदानावर पार पडला हा सोहळा नांदगावकरांसाठी एक ऐतिहासिक क्षणाची पर्वणीच होती.

नांदगाव शहरातील प्रमुख व मध्यवर्ती मार्गावरुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याची भव्य रथातून मिरवणूक काढली या बरोबरच छत्रपती शिवाजी महाराज झालेला यथार्थ नाईक सजवलेला व जरीपटका असलेल्या हात्तीवर स्वार झाला होता.या मिरवणुकीत नांदगाव पंचक्रोशीतील नागरिकांनी सहभाग घेतला. खासदार संभाजी राजे हे देखील मिरवणुकीत सहभागी झाले होते. या बरोबरच विविध वेषभूषा केलेले विद्यार्थी,मैदानी खेळाचे प्रात्यक्षिक आणि ढोल-ताशांच्या व लेझीम, मराठमोळ्या पोषाख घातलेले युवक व युवती या मिरवणुकीत सहभागी झाले होते. अप्रतिम असे नयनरम्य दृश्य मनमोहक होते. ही मिरवणूक रेल्वेगेट पासुन शिवस्फूर्ती मैदानावर आल्यानंतर खासकरुन काशी वरुन आलेल्या पुरोहितांच्या हस्ते सोन्याच्या मुलामा असलेली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याची संभाजी राजे छत्रपती यांच्या हस्ते मंत्रोच्चारात पुजन करण्यात आले. त्यापुर्वी खासदार संभाजी राजे यांची लाडू द्वारे तुला करण्यात आली व उपस्थित शिवप्रेमींना लाडु प्रसाद म्हणून वाटण्यात आले. त्यानंतर छ.शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याची स्थापना करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेष्ठ नेते बापू साहेब कवडे यांनी केले. बापुसाहेब यांनी आ. सुहास आण्णा यांनी मतदारसंघात केलेल्या अनेक भरीव कामांची माहिती दिली. शिवाय अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मनमाडकरांचा पाणीप्रश्न सोडविला त्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज युवराज खासदार संभाजी राजे छत्रपती यांना चांदीची तलवार आ.सुहास आण्णा कांदे यांनी भेट दिली.

शिवाजी महाराजांच्या घराण्यात जन्म घेणे याचा मला सार्थ अभिमान आहे. शिवाजी महाराजांनी उन्हातानात फिरुन स्वराज्य निर्माण केले. ते रांगडे होते. त्याच प्रमाणे आम्ही देखील रांगडे आहोत. एसी मध्ये फिरून बसलो तर आमचा काय उपयोग? आमच्यातही रांगडेपणा आहे. असे युवराज संभाजी राजे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण समारंभ प्रसंगी म्हणाले. तुम्ही संभाजीराजांचे स्वागत केले नाही तर, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वागत केले. याचा मला आनंद वाटतो.पुढे ते असेही म्हणाले की, छत्रपतींना शासनाने दिलेले शब्द शासनाला पाळावेच लागेल. संभाजी राजे हे नेतृत्व केवळ मराठा समाजाचेच करत नाही, तर बहुजनांचे नेतृत्व करत आहे. महाराष्ट्रात पहिले आरक्षण करवीर संस्थानचे छत्रपती शाहू महाराजांनी दिले. मी त्यांचा आदर्श समोर ठेवून बहुजन समाजाला जोडण्याचे काम करत आहे . गरीब मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. वंचितांना शिक्षण आणि त्यांचा विकास होणे हाच माझा ध्यास आहे .ओबीसी- मराठा वाद चुकीचा आहे शिवाजी महाराजांचे विचार आचार यांचे चिंतन करा. स्वराज्य हे सुराज्य व्हावे ही शिवाजी महाराजांची यांची इच्छा होती. ते साध्य करण्यासाठी त्यांचे विचार सामान्य जनतेमध्ये पोहोचले पाहिजे. शिवाजी महाराजांचा जयजयकार करणे स्मारक उभारणे आवश्यक आहे. पण एक ते दोन महिन्यातून एकदा तरी शिवाजी महाराजांचे विचार रुजवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे .आ. सुहास आण्णा यांना म्हणाले की,आमची काळजी करु नका त्या पेक्षा सर्वसामान्य जनतेची काळजी करा. त्यांच्यामुळेच आपण स्टेजवर बसतो, मानपान वाढतो.म्हणून या जनतेची काळजी करा. असे युवराज संभाजी राजे छत्रपती आपल्या भाषणात म्हणाले.

आमदार सुहास आण्णा कांदे स्वागतपर भाषणात म्हणाले की,युवराज संभाजी राजे यांनी दलित मराठा समाजाला न्याय मिळवुन दिला.सर्व जाती, धर्माचे रक्षण करण्यासाठी आपण झटतात याचा अभिमान वाटतो.तुम्हाला माझी नेहमी साथ असेल गरज पडेल तेव्हा फक्त आदेश द्या,मी आपला मावळा म्हणून तुमच्या सेवेला हजर असेल.दलित मराठा समाजाच्या मागण्यांसाठी शासनाचा प्रतिनिधी म्हणून पाठपुरावा करेल.त्या मागण्या मान्य न झाल्यास मी आमदारकीचा राजीनामा देईल.मला फक्त आदेश द्या ,मी आपला मावळा आहे. आण्णासाहेब पाटील महामंडळावर संचालक मंडळाची मागणी शासनाने मान्य केली आहे.कोपर्डी खुन खटल्यातील आरोपींना फाशी व्हावी यासाठी प्रयत्न केले जावेत.तसेच मराठा समाजाच्या आंदोलन काळात ज्यांनी आत्मदहन केले त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सहकारी संस्थांमध्ये निर्माण करी देवुन त्यांचे पुनर्वसन केले जावे. यासाठी प्रयत्न केले ते मान्य झाले. मराठा समाजाचे मुल- मुलींना शिक्षणासाठी नाशिक ला जागेचे आरक्षण करुन चार-सहा महिन्यात वसतिगृहे उभारण्याचा आपल्या हाताने उदघाटन करू,असे आश्वासन आ. सुहास आण्णा कांदे यांनी दिले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार लंडनहुन लवकरच महाराष्ट्रात आणण्यासाठी ची शासनाकडून परवानगी घेतली असल्याचे सुतोवाच त्यांनी केले. महाराज तुम्ही शासनाकडे केलेल्या मागण्यांचा शासनाकडे पाठपुरावा करेल . महाराजांच्या मागण्या मान्य नाही झाल्यातर आपल्या आदेशाने आमदारकीचा पहिला राजीनामा देईल असे आमदार सुहास आण्णा कांदे म्हणाले.
यावेळी कर्तव्य दक्ष अधिकारी व सामन्य नागरिकांना न्याय मिळवुन देणारे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पोलीस उपविभागीय अधिकारी समिरजी साळवे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची सकाळ, संध्याकाळ नित्यनियमाने पुजा व आरती करणाऱ्या संगीता सोनवणे यांचा सत्कार व गौरव करण्यात आला.आमदार सुहास आण्णा कांदे यांनी दररोज नित्यनियमाने सकाळ-संध्याकाळच्या पुजेसाठी येणारा खर्चासाठी बँकेत फिक्स डिपाँजीट विशिष्ट रक्कम ठेवुन तरतुद केली आहे. या सोहळ्याला बापू साहेब कवडे,माजी आ.राजाभाऊ देशमुख,अंजुमताई कांदे, विलास आहेर,तेज कवडे,नगराध्यक्ष राजेश कवडे,शिवसेना तालुका अध्यक्ष किरण देवरे,विष्णू निकम,व मराठा महासंघाचे जिल्ह्यातील पदाधिकारी, तसेच तालुका व परिसरातील अनेक मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील सुयश पवार , हसनेन शेख , खुशाल परळकर , गौरव निते व सौरभ चव्हाण यांची नाशिक जिल्हा क्रिकेट आसोसिएशन 14 वर्षातील संघाच्या संभाव्य खेळाडु यादित निवड.

भुमी क्रिकेट अकॅडमीतील सुयश पवार , हसनेन शेख , खुशाल परळकर , गौरव निते व सौरभ चव्हाण यांची नाशिक जिल्हा क्रिकेट आसोसिएशन 14 वर्षातील संघाच्या संभाव्य खेळाडु यादित निवड.

  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने ) नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, ‘शिक्षक दिन ‘,’श्री चक्रधर स्वामी अवतार दिन’ तसेच ‘मदर तेरेसा स्मृतिदिन’ संपन्न

सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, ‘शिक्षक दिन ‘,’श्री चक्रधर स्वामी अवतार दिन’ तसेच ‘मदर तेरेसा स्मृतिदिन’ संपन्न

मनमाड -येथिल सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, 'शिक्षक दिन ','श्री चक्रधर स्वामी अवतार दिन' तसेच 'मदर...

read more
गरीब रुग्णाच्या सेवे साठी सलग 08 वे वर्षी श्री नीलमणी ट्रस्ट तर्फे शिल्लक औषध संकलन उपक्रम

गरीब रुग्णाच्या सेवे साठी सलग 08 वे वर्षी श्री नीलमणी ट्रस्ट तर्फे शिल्लक औषध संकलन उपक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिध्द...

read more
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट संचलि, श्री निलमणी गणेश मंडळ मनमाड – लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असणाऱ्या आदर्श सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा 28 वे वर्ष

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट संचलि, श्री निलमणी गणेश मंडळ मनमाड – लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असणाऱ्या आदर्श सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा 28 वे वर्ष

मनमाड - हिंदू संस्कृतीचे जतन व्हावे, समाजात जनजागृती होवून समाज संघटीत व्हावा, राष्ट्रभक्तीची...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]