नांदगाव येथील लोकनेते दिगवंत गंगाधर शिवराम आहेर नांदगाव तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत प्राथमिक शिक्षक समिती, शिक्षक भारती, पदवीधर शिक्षक संघटना आणि शिक्षक सेनेच्या परिवर्तन पॅनलने एकूण 13 पैकी 12 जागांवर दणदणीत विजय मिळविला. तर शिक्षक संघ पुरस्कृत शिक्षक सेवा संघ पँनलचे प्रमुख राजेंद्र नारायण पाटील यांचा विजय प्राप्त झाला.तालुक्यातील अनेकांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. वीस वर्षापासून प्राथमिक शिक्षक संघाचे पतसंस्थेवर एक हाती वर्चस्व होते. मतदारांनी यावेळी मात्र परिवर्तन करून दाखविले असले तरी शिक्षक संघाचे नेतृत्व करणारे राजेंद्र नारायण पाटील यांना मात्र विजय मिळाला हा एक चर्चेचा विषय बनला आहे. विजयी उमेदवारांमध्ये भाऊसाहेब मवाळ ( 199 )अनिल बोरसे ( 196) रवींद्र बोरसे (185) राजेंद्र पाटील (177) संजय शेवाळे (174) शरद पवार (173) प्रकल्प पाटील( 172) कांतीलाल जाधव (168 )शीला दिसले (193 ) चारुलता पाटील ( 155 )परशराम शेळके (172) प्रवीण ठाकरे (208 )धोंडीराम पठाडे (181 ) विजयी उमेदवारांमध्ये समावेश आहे. निवडणूक अधिकारी म्हणून नंदराज साळवे यांनी काम बघीतले.
आज पासून श्री दत्त जयंती सप्ताह सोहळ्यास भक्तीमय वातावरणात प्रारंभ
मनमाड : योगेश म्हस्के शहरातील श्री दत्त मंदिर आणि श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र येथे श्री...









