loader image
[ays_poll id=7]

मनमाड न्यायालयात लोकअदालतीत २६१ प्रकरणे निकाली

Mar 14, 2022


मनमाड : मनमाड न्यायालयात झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये एकूण ३२४७ पैकी २६१ प्रकरणांचा निपटारा करण्यात येवून ६६ लाख ४६ हजार ३८४ रूपये वसुल करण्यात आले . त्यामध्ये दाखलपूर्व २७६६ प्रकरणांपैकी १६५ प्रकरणांचा निकाल लावण्यात येवून २ ९ लाख ४१ हजार ५०५ रूपये तर प्रलंबित ४६१ प्रकरणांपैकी ९ ६ प्रकरणांचा निकाल होवून ३७ लाख ०४ हजार ८७ ९ रूपये वसुल करण्यात आले.

            मनमाड न्यायालयात ज्युडीशियल मॅजेस्ट्रेट शलाका लोमटे व रेल्वेचे न्यायाधिश गणेश घुले यांच्या मार्गदर्शनाखाली वकील संघाचे अध्यक्ष अॅड . सुधाकर मोरे तसेच द्विसदस्यीय बेंच सदस्य अॅड . ए.के. निकम व ॲड.ए.एस. पठाण यांनी या राष्ट्रीय लोकअदालतीचे संयोजन केले . मनमाड वकील संघाचे उपाध्यक्ष अॅड . राजेंद्र पालवे , सचिव अॅड . किशोर चोरडिया , सहसचिव अॅड . बापट , अॅड . राजेंद्र पांडे , अॅड . नासिर पठाण , अॅड . के . एस . मल्हारे , ॲड.पी.के.मुलचंदानी , ॲड.के. एस . संसारे तसेच २१ न्यायालयीन कर्मचाऱ्यांसह बँक , नगरपालिका , पतसंस्था , ग्रामपंचायत , महावितरण यांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते . 

               बँक व पतसंस्था यातील दाखलपूर्व ५९५ पैकी १८ प्रकरणांचा निकाल होवून २४ लाख ७७ हजार ९ ५० रूपयांची वसुली झाली . गुन्हेगारी केसेसमधील प्रलंबित २२८ प्रकरणांपैकी ३६ प्रकरणे निकाली काढण्यात आली . महावितरणच्या दाखलपूर्व ८८४ प्रकरणांमधून ६ प्रकरणे निकाली होवून ५० हजार ९१० रूपये वसुल करण्यात आले . मनमाड नगरपालिकेच्या विविध प्रलंबित कर आकारणीच्या १४१ दाखलपूर्व प्रकरणापैकी ८ प्रकरणांचा निकाल होवून १ लाख ७४ हजार १७७ रूपये वसुल झाले.

        मॅट्रीमोनिअल प्रलंबित ३४ पैकी ७ प्रकरणे निकाली झाली . तर एनआय अॅक्टच्या १३८ कलमाखालील प्रलंबित १६७ पैकी २६ प्रकरणांचा निपटारा करण्यात येवून त्यातून ३७ लाख १ हजार २ ९ रूपये वसुल करण्यात आले.

        तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीमधील दाखलपूर्व ११४६ प्रकरणांपैकी १३३ चा निकाल लावण्यात येवून २ लाख ३८ हजार ४६८ रूपयांची वसुली झाली तर प्रलंबित २८ पैकी ३ प्रकरणांचा निकाल झाला . तर इतर प्रलंबित २४ पेट्टी केसेस पैकी सर्व प्रकरणांचा निकाल होवून ३ हजार ८५० रूपये वसुल झाले . रेल्वे कोर्टातील १९२ गुन्हेगारी केसेस पैकी ३० केसेस निकालासाठी ठेवण्यात आल्या होत्या.परंतु यापैकी एकाही प्रकरणाचा निकाल होवू शकला नाही. 

मनमाड न्यायालय व रेल्वे न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमाने मार्चमध्ये घेण्यात आलेल्या या राष्ट्रीय लोकअदालतीसमोर ठेवण्यात आलेल्या ३२४७ पैकी फक्त २६१ प्रकरणांचा निकाल लागला.निकालाचे हे प्रमाण अवघे ८.०४ टक्के राहिले आहे.

फोटो : 


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.