Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नांदगाव तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या निरंक

Mar 14, 2022

मनमाड शहर व तालुक्यात तिसऱ्या लाटेनंतर कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात असून एकूण सक्रिय रुग्णांची संख्या शून्य आहे . तब्बल दोनवर्षानंतर तालुक्यामधील बाधितांची संख्या शून्य असल्याने अशादायक चित्र निर्माण झाले आहे . कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमधून सावरत असून अनेक राज्यांमध्ये बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घसरण झाली आहे . महाराष्ट्रातही कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात असून दिवसेंदिवस नवबाधितांपेक्षा या आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे . नाशिक जिल्हादेखील त्याला अपवाद नाही . मागील सहा दिवसांमध्ये कोरोनाच्या एकाही नोंद नाही . तर सक्रिय रूग्णांची संख्यादेखील घसरली आहे . पहिल्या लाटेत ग्रामीण भागात कोरोना नियंत्रणात होता . पण दुसऱ्या व तिसऱ्या लाटेत या आजाराने ग्रामिण भागाला अक्षरश : वेठीस धरले होते . शहरात अन्य तालुक्यांमध्ये बाधितांची संख्या हजारापार पोहोचली होती . त्यामुळे प्रशासनाच्या डोकेदुखीत भर पडली . पण कोरोनाची तिसरी लाट नियंत्रणात येत असतांना ग्रामिण भागातील चित्रही झपाट्याने पलटले आहे . आजमितीस शहर व ग्रामीण तालुक्यात बाधितांची नोंद झाली आहे . एकेकाळी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या शहरात शून्य बाधित असून तालुका कोरोनामुक्त झाला आहे . नांदगाव मध्येही रूग्णसंख्या शून्यावर आली आहे . सद्यस्थितीत नव रूग्णांपेक्षा बरे होण्याची संख्या अधिक असल्याने महिना अखेर सक्रिय रूग्णांची संख्या बोटावर मोजण्याइतपत खाली आलेली असेल .

अजून बातम्या वाचा..

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]