loader image
[ays_poll id=7]

१२ वर्षापुढील मुलांना १६ मार्च पासून दिले जाणार डोस

Mar 14, 2022


देशात सध्या कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे. आज देशात २ हजार ५०३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आणि २७ रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत देशातील लसीकरण १ अब्ज ७९ कोटी ९१ लाख ५७ हजार ४८६ झाले आहे. अनेक तज्ज्ञांनी देशातील कोरोना नियंत्रित आल्यामागचे कारण वेगाने लसीकरण सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून लहान मुलांचे लसीकरण केव्हा सुरू होणार याकडे लक्ष लागले आहे. यादरम्यान सरकारने लसीकरणसंदर्भात दोन मोठे निर्णय घेतले आहेत. केंद्र सरकारने १२ ते १४ वयोगटातील मुलांचे १६ मार्चपासून लसीकरण करण्यास परवानगी दिली आहे. तसेच ६० वर्षांवरील वृद्ध बूस्टर डोसही घेऊ शकणार आहेत. याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे.केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया ट्वीट करून म्हणाले की, ‘मुले सुरक्षित तर देश सुरक्षित. मला सांगताना खूप आनंद होत आहे की, १६ मार्चपासून १२ ते १३ आणि १३ ते १४ वयोगटातील मुलांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरुवात होत आहे. शिवाय ६० वर्षांवरील सर्व लोकं आता बूस्टर डोस घेऊ शकतात. त्यामुळे माझे मुलांच्या पालकांना आणि ६० वर्षांवरील लोकांना लसीकरण करण्याची विनंती आहे.’

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया ट्वीट करून म्हणाले की, ‘मुले सुरक्षित तर देश सुरक्षित. मला सांगताना खूप आनंद होत आहे की, १६ मार्चपासून १२ ते १३ आणि १३ ते १४ वयोगटातील मुलांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरुवात होत आहे. शिवाय ६० वर्षांवरील सर्व लोकं आता बूस्टर डोस घेऊ शकतात. त्यामुळे माझे मुलांच्या पालकांना आणि ६० वर्षांवरील लोकांना लसीकरण करण्याची विनंती आहे.’

दरम्यान १२ ते १४ वर्षांच्या वयोगटातील मुलांना Corbevax को Biological E Limited कंपनीने विकसित केलेली Corbevax कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जाणार आहे. तसेच सध्या आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर्स आणि ६० वर्षांवरील कोणताही आजार असलेल्या कोरोनाचा बूस्टर डोस दिला जात आहे. मात्र १६ मार्चपासून ६० वर्षांवरील लोकांनाही बूस्टर डोस दिला जाणार आहे.


अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
.