११ मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या राज्य शासनाच्या राजपत्रात नगर पालिकांच्या प्रभागांमध्ये विभागणी करण्याची व हद्दी विनिर्दिष्ट करण्याची प्रक्रिया पुन्हा नव्याने करण्यात येणार असल्याचे या राजपत्रात जाहीर केल्याने आताच नगरपालिकेने जाहीर केलेल्या प्रभाग रचना रद्द झाल्या आहेत. अनुसूचित जाती जमाती, नागरिकांचा मागासवर्ग आणि महिला यांच्यासाठी जागा राखून ठेवल्या आहेत असे प्रभाग नव्या राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या आदेशानुसार विनिर्दिष्ट करील. सर्व प्रभागाना अशा आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी नगर परिषद क्षेत्रातील निरनिराळ्या प्रभागांमध्ये अशा जागा आळीपाळीने राखून ठेवलेल्या आहेत अशी खात्री केली जाईल असेही राजपत्रात नमूद करण्यात आले आहे. नगरपालिकेने जाहीर केलेली प्रभाग रचना त्यामुळे रद्द झाली आहे. प्रभाग रचना रद्द झाल्याने इच्छुक उमेदवार, बाशिंगवीरांचा हिरमोड झाला आहे.
मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...











