loader image
[ays_poll id=7]

महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर मोक्का लावण्याची मनमाड शहर शिवा संघटनेची मागणी

Mar 15, 2022


मनमाड : बजाजनगर जिल्हा संभाजी नगर ( औरंगाबाद ) येथील शिवा सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरातील क्रांतीसूर्य , जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची तोडफोड करुन विटंबना करणाऱ्या व एम.आय.डी.सी. च्या जागा हडप करणाऱ्या कैलास भोकरे व त्यांच्या साथीदारांवर मोका अंतर गुन्हा दाखल करुन त्याला हद्दपार करावे व एम.आय.डी.सी.च्या जागा हडपण्यासाठी मदत करणाऱ्या एम.आय.डी.च्या अधिकाऱ्यांची कसून चौकशी करुन त्यांना निलंबित करण्या बाबत मनमाड शहर शिवा संघटना आणि वीरशैव लिंगायत समाज बांधवांनी येथील पोलीस उपनिरीक्षक गणेश तायडे यांना निवेदन दिले.

बाराव्या शतकातील समता नायक , महान क्रांतिकारक , आद्य लोकशाही संसदेचे जनक , समाजसुधाकर , क्रांतीसूर्य , जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची विटंबना दिनांक ८ मार्च २०२२ रोजी शिवा सिद्धेश्वर महादेव मंदिर , बजाजनगर जिल्हा संभाजीनगर ( औरंगाबाद ) मध्ये घडली . आपल्या देशात आपण सर्वच महापुरुषांचा आदर करतो , बजाजनगर जिल्हा संभाजीनगर येथे महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची तोडफोड करुन विटंबना करणारी घडलेली घटना ही आपल्या लोकशाही देशात अतिशय संतापजनक व सामाजिक लोकशाही आणि मानवतेला काळीमा लावणारी असून संबंधित गुंड प्रवृत्तीच्या समाजकंटक कैलास भोकरे याला अटक त्याला मोका कायदा अंतर्गत कडक कारवाई करुन हद्दपार करावे व एम.आय.डी.सी. च्या खाली जागा हडपण्यासाठी मदत करणाऱ्या एम.आय.डी.सी.च्या अधिकाऱ्यांच्या कसुन चौकशी करुन त्यांना निलंबीत करावे . या घटनेचा जिल्हा शिवा संघटना , वीरशैव लिंगायत समाज व महात्मा बसवेश्वर प्रेमींच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे व गुन्हेगारांना कडक शासन करुन हद्दपार करण्याची मागणी करत आहोत. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

      याप्रसंगी शहराध्यक्ष कैलास वाडकर, ज्येष्ठ समाज बांधव गोविंद लिंगायत, नंदू गोंधळे ,विजय गोंधळे, नितीन गुळवे, शशीकांत हिंगमीरे, कृष्णा सुराडे, बाळासाहेब गोंधळे, दत्तात्रय तोडकर, शंकर चिनुके,संतोष चुनके,हर्षद कोरपे ,अशोक बिदरी ,सोनू चुनके ,कुणाल गोंधळे ,पंकज सुराडे, विजय तोडकर, करण वाडकर, मदन हिंगमिरे, रमेश गोंधळे, प्रशांत तक्ते, बाळु क्षीरसागर आदींनी निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.