loader image

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात हरणाचा मृत्यू

Mar 15, 2022


मौजे कातरवाडी वडगाव पंगु वनविभाग हद्दीत आज सायंकाळी ५:३० च्या सुमारास परिसरातील भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात हरणाचा मृत्यू झाला….. कातरवाडी येथील शेतकरी संदीप झाडे यांच्या शेतालगत ही घटना घडली… शेतात काम करत असताना त्यांच्या ही घटना लक्षात आली… त्यांनी तात्काळ भागवत झाल्टे यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली…. भागवत झाल्टे यांनी वनमजूर भाऊसाहेब झाल्टे,यांच्यासह ग्रामस्थ संदीप झाल्टे,सुभाष संसारे,यांना सोबत घेत घटना स्थळी धाव घेतली…परंतु भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात हरणाचा मृत्यू झाला होता. निसर्गप्रेमी नागरिकांकडून सदर घटनेबाबत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसेच परिसरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.काही महिन्यांपूर्वी सुध्दा या परिसरातील बेवारस कुत्र्यांच्या हल्ल्यात परिसरातील बालकांना गंभीर दुखापत झाली होती. भटक्या बेवारस कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
.