Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात हरणाचा मृत्यू

Mar 15, 2022

मौजे कातरवाडी वडगाव पंगु वनविभाग हद्दीत आज सायंकाळी ५:३० च्या सुमारास परिसरातील भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात हरणाचा मृत्यू झाला….. कातरवाडी येथील शेतकरी संदीप झाडे यांच्या शेतालगत ही घटना घडली… शेतात काम करत असताना त्यांच्या ही घटना लक्षात आली… त्यांनी तात्काळ भागवत झाल्टे यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली…. भागवत झाल्टे यांनी वनमजूर भाऊसाहेब झाल्टे,यांच्यासह ग्रामस्थ संदीप झाल्टे,सुभाष संसारे,यांना सोबत घेत घटना स्थळी धाव घेतली…परंतु भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात हरणाचा मृत्यू झाला होता. निसर्गप्रेमी नागरिकांकडून सदर घटनेबाबत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसेच परिसरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.काही महिन्यांपूर्वी सुध्दा या परिसरातील बेवारस कुत्र्यांच्या हल्ल्यात परिसरातील बालकांना गंभीर दुखापत झाली होती. भटक्या बेवारस कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

अजून बातम्या वाचा..

पक्ष्यांसाठी दाणा-पाण्याची सोयनांदगाव जे.टी.कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा उपक्रम

पक्ष्यांसाठी दाणा-पाण्याची सोय
नांदगाव जे.टी.कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा उपक्रम

नांदगाव, दि 18 मार्च 2022 उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. उन्हाच्या तीव्रतेमुळे कासावीस झालेल्या...

read more
जय भवानी अद्ययावत व्यायाम शाळेच्या पाच खेळाडूंची महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघात निवड

जय भवानी अद्ययावत व्यायाम शाळेच्या पाच खेळाडूंची महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघात निवड

भुवनेश्वर येथे होणाऱ्या राष्ट्रीय युथ ज्युनिअर सीनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी जय भवानी अद्ययावत...

read more
ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉइज असो. च्या वतीने ना.आठवले यांना विविध मागण्यांचे निवेदन

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉइज असो. च्या वतीने ना.आठवले यांना विविध मागण्यांचे निवेदन

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशनच्या शिष्टमंडळाने झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]