loader image
[ays_poll id=7]

श्री एच. एच. जे. बी.तंत्रनिकेतनच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

Mar 16, 2022


महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण परीक्षा मंडळ मुंबई यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या हिवाळी – २०२१/२२ च्या परीक्षेत श्री एच. एच. जे. बी. तंत्रनिकेतनच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. तंत्रनिकेतनमधील प्रथम वर्षाच्या चार अभ्यासक्रमात मेकॅनिकल इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमाचा विद्यार्थी कु. देशमुख सुजल तुषार याने ९२. ८६ टक्के गुण मिळवत प्रथम येण्याचा बहुमान मिळविला. तसेच द्वितीय वर्षाच्या चार अभ्यासक्रमात कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमाचा विद्यार्थी कु. अहिरे शुभम नितीन याने ९४.८० टक्के गुण मिळवत प्रथम येण्याचा बहुमान मिळविला. तृतीय वर्षाच्या चार अभ्यासक्रमात मेकॅनिकल इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमाचा विद्यार्थी कु. कोतवाल मेहुल मनोज याने ९८ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला . प्रथम वर्ष सिव्हील इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी वांजुळे हितेश सुखदेव याने ८७. ७१ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. वाघ ओम संतोष याने ८५. २९ टक्के गुण मिळवत द्वितीय , डुंगरवाल सम्यक शीतल याने ८४. २९ टक्के गुण मिळवत तृत्तीय क्रमांक पटकावला. द्वितीय वर्ष सिव्हील इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी देवरे तेजस दौलतराव याने ९१ . ७८ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. रौंदल कुणाल सुरेश याने ८७. ८९ टक्के ,कर्डिले ओमकार महेंद्र याने ८५ टक्के गुण मिळवत द्वितीय व तृत्तीय क्रमांक पटकावला. तृतीय वर्ष सिव्हील इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी शेवाळे जयेश बाळू याने ८७. ४ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. डुंगरवाल प्रथम सुनील याने ८६ .८ टक्के , भाबड श्रीराज सुनील याने ८६ . ५ टक्के गुण मिळवत द्वितीय व तृत्तीय क्रमांक पटकावला. प्रथम वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी कु. सोनवणे प्राची महेंद्र हिने ८७. ८६ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कु. पवार चारुशीला दौलत हिने ८७. २९ टक्के मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला व चिन्मय प्रकाश जैन याने ८६ . ८६ , जाबेझ नितीन त्रिभुवन याने ८६ . ८६ टक्के गुण मिळवत तृत्तीय क्रमांक पटकावला. द्वितीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी अहिरे शुभम नितीन याने ९४.८० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. क्षत्रिय स्वामी नारायण याने ९३.६० टक्के व कु. शिंदे वृषाली प्रकाश हिने ९३.६० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला. कु. कदम वैष्णवी ललित हिने ९२.८० टक्के गुण मिळवत तृत्तीय क्रमांक पटकावला. तृतीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमाचे बच्छाव हर्षल दिपक याने ९४. ७८ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कु. बच्छाव सोनाली सुरेश हिने ९३. ७८ टक्के व कु. बाफना श्रुती महेंद्र हिने ९१. २२ टक्के गुण मिळवत द्वितीय व तृत्तीय क्रमांक पटकावला . प्रथम वर्ष इलेक्ट्रॉनिक आणि टेलीकॅम्युनिकेशन इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी जैन अर्पित अनिल याने ८३ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कु. पंडित श्रुती संजय हिने ८२ टक्के व कु.घोलप श्वेता संजय हिने ८१ टक्के गुण मिळवत द्वितीय व तृत्तीय क्रमांक पटकावला. द्वितीय वर्ष इलेक्ट्रॉनिक आणि टेलीकॅम्युनिकेशन इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी निकम यश नंदकिशोर याने ९१. ४१ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. उन्मेष अविनाश भोई याने ८९. ०६ टक्के व मोरे सत्यम जगदीश याने ८६ . ७१ टक्के गुण मिळवत द्वितीय व तृत्तीय क्रमांक पटकावला. तृतीय वर्ष इलेक्ट्रॉनिक आणि टेलीकॅम्युनिकेशन इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी कु. देसले सविता वसंत हिने ८७. ५८ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. राजगिरे आकाश ज्ञानेश्वर याने ८६. १ १ टक्के व शेळके धीरज संजय याने ८४. ६३ टक्के गुण मिळवत द्वितीय व तृत्तीय क्रमांक पटकावला. प्रथम वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी देशमुख सुजल तुषार याने ९२. ८६ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. संभव सचिन भंडारी याने ८५. ८६ टक्के व चोठमल आर्यन अरुण याने ८५. ४३ टक्के गुण मिळवत द्वितीय व तृत्तीय क्रमांक पटकावला. द्वितीय वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी कु. वाघ श्रुतिका सूर्यभान हिने ९२. ९४ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. बुरुकुल प्रतीक दिलीप याने ९०. ५२ टक्के व धात्रक तेजस्विनी हेमराज याने ८४.५२ टक्के गुण मिळवत द्वितीय व तृत्तीय क्रमांक पटकावला .तृतीय वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी कोतवाल मेहुल मनोज याने ९८ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. संधन दुर्गेश लक्ष्मण याने ९३. ८१ टक्के व कोतवाल साक्षी प्रकाश हिने ९३. ८१ टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला व पवार योगेश रमेश याने ९२ टक्के गुण मिळवत तृत्तीय क्रमांक पटकावला . या उज्ज्वल यशस्वी परंपरेसाठी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. व्ही .ए. वानखेडे, सिव्हील विभागाचे विभागप्रमुख श्री एच. एस. गौडा, मेकॅनिकल विभागाचे विभागप्रमुख श्री डी .व्ही. लोहार, कॉम्प्युटर विभागाच्या विभागप्रमुख कु. एस.एस. चोरडिया, इलेक्ट्रॉनिक आणि टेलीकॅम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाचे विभागप्रमुख श्री एन.आर. ठाकरे व सर्व शिक्षक व शिक्षेकेतर सहकार्यांनी परिश्रम घेतले आहेत. विश्वस्त समितीचे अध्यक्ष मा.श्री. बेबीलालजी संचेती व विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष मा.श्री. दिनेशजी लोढा, मानद सचिव मा.श्री. जवाहरलालजी आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष मा.श्री. अजीतकुमारजी सुराणा, प्रबंध समितीचे उपाध्यक्ष आणि तंत्रनिकेतनाचे समन्वयक मा.श्री. अरविंदकुमारजी भन्साळी, सह मानद सचिव मा.श्री. झुंबरलालजी भंडारी, व तंत्रनिकेतनाचे मुख्य समन्वयक तथा प्रबंध समिती सदस्य मा.श्री. राजेंद्रकुमारजी बंब यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .


अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.