loader image
[ays_poll id=7]

लोकअदालतला महावितरणच्या ग्राहकांचा प्रतिसाद

Mar 16, 2022

नाशिक परिमंडलात ४५५ ग्राहकांनी केला ५३ लाख रुपयांचा भरणा

कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेले व  वीज चोरी संबंधित न्यायालयात प्रलंबित असलेली अशा महावितरणशी  संबधित नाशिक, मालेगाव आणि अहमदनगर  मंडळातील  एकूण ४५५ ग्राहकांनी प्रतिसाद देऊन  तडजोडीच्या  माध्यमातून शनिवारी १२ मार्च  रोजी नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये  घेण्यात आलेल्या  लोकअदालत मध्ये ५३ लाख ७३ हजार रुपयांचा भरणा करून सदर प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे.   

शनिवारी १२मार्च  २०२२ रोजी झालेल्या लोकअदालतमध्ये  महावितरणकडून कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेले व वीजचोरी संबंधित  दाखलपूर्व प्रकरणे आणि न्यायालयात प्रलंबित  असलेली  हजारो  प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती, त्यात कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेले ग्राहक यामध्ये नाशिक मंडळात ६२ ग्राहकांनी ११ लाख ०७ हजार, मालेगाव मंडळातील १९ ग्राहकांनी १ लाख ४६ हजार तसेच अहमदनगर मंडळातील ६९ ग्राहकांनी ४ लाख ९८ हजार असे नाशिक परिमंडलात  एकूण  १५० दाव्यामध्ये ग्राहकांनी तडजोड करीत १८ लाख १४ हजार रुपयांचा भरणा केला तसेच वीजचोरी संबंधित दाव्यांमध्ये नाशिक  मंडळामध्ये एकूण ५६ दाव्यामध्ये तडजोड करीत ग्राहकांनी  ७लाख २८ हजार रुपयांचा भरणा केला, मालेगाव  मंडळामध्ये एकूण ४९ दाव्यामध्ये तडजोड करीत ग्राहकांनी  ३लाख ३४ हजार रुपयांचा भरणा केला आणि अहमदनगर मंडळामध्ये एकूण १६६ दाव्यामध्ये तडजोड करीत ग्राहकांनी  १५लाख १७ हजार रुपयांचा भरणा केला आहे,तसेच नाशिक मंडळामध्ये कृषीपंपाच्या ३४ ग्राहकांनी ९ लाख ८० हजार रुपयांचा भरणा केला आहे. अशी एकूण नाशिक परिमंडलामध्ये एकूण  ४५५ प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यात आली यामध्ये ५३ लाख ०७३ हजार रुपयांचा भरणा केला आहे. यासाठी विधी सेवा प्राधिकरण अधिनियम १९८७ च्या कलम २० (२) प्रमाणे संबधीताना नोटीस पाठविण्यात  आल्या होत्या, संबधीतानी नाशिक व अहमदनगर मधील जिल्हा व तालुका न्यायालयात उपस्थित राहून त्यांनी या संधीचा लाभ घेतला. या लोकअदालतीमध्ये विनाविलंब न्याय मिळवण्याच्या दृष्टीकोनातून तसेच  परस्पर समन्वयासाठी सदर लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. भविष्यातील आर्थिक व मानसिक कटकटींपासून सुटका होत असल्याने  ग्राहकांनी  या लोकअदालतीचा लाभ घेतला. महावितरणच्या नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक्षक अभियंते ज्ञानदेव पडळकर, रमेश सानप आणि सुनिल काकडे, वित्त व लेखा विभागाचे सहायक महाव्यवस्थापक लक्ष्मण वसावे, वरिष्ठ व्यवस्थापक रामेश्वर कुमावत आणि प्रभारी वरिष्ठ व्यवस्थापक अनिलकुमार आहिरे,  सहाय्यक विधी अधिकारी प्रशांत लहाने, कनिष्ठ विधी अधिकारी नीतल वर्पे  यांचेसह कार्यकारी अभियंते, अभियंते, वित्त व लेखा विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.  

सदर लोकअदालतसाठी  नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश अभय वाघवसे , मालेगाव जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. बी.बहालकर, निफाड जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर जी वाघमारे  तसेच नाशिक  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शिवाजी इंदलकर  यांनी यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच न्यायालयीन कर्मचारी रोहन सोनावणे व इतर कर्मचारी यांनी यासाठी सहकार्य केले.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.