Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड शहरात होळी सण उत्साहात साजरा

Mar 17, 2022

होळी हा सण फाल्गुन पौर्णिमेला म्हणजेच हुताशनी पौर्णिमेला साजरा केला जातो. होळी या सणाला होलिका उत्सव असेही म्हटले जाते. माग महिना संपून फाल्गुन महिना लागताच ऋतुचा राजा म्हणजे वसंताचे आगमन होते. यामुळे होळीच्या सणाला सर्वत्र हिरवेगार वातावरण असते. सर्व झाडे पाना फुलांनी बहरलेले असतात. जणू धरती माता हिरव्या रंगाचा शालू पांघरून नटून-थटून बसलेली आहे की काय, असा भास होतो. ठिक ठिकाणी देवी-देवतांच्या यात्रा उत्सवाला सुरुवात झालेली असते, सर्वत्र आनंदी आनंद पसरलेला असतो. अशा या आनंदात भर घालण्यासाठी येतो तो होळीचा सण. आपल्या भारतात प्रांत जरी वेगवेगळे असले तरीही संस्कृती मात्र एकच जोपासली जाते, प्रत्येक सन प्रत्येक प्रांतात वेगवेगळे वेगळ्या पद्धतीने व नावाने साजरे केले जातात.

होळी या सणाला महाराष्ट्रात शिमगा या नावाने ओळखतात तर उत्तर भारतात याला दोला यात्रा किंवा होरी असेही म्हटले जाते. दक्षिण भारतात हा उत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा करतात परंतु प्रत्येक ठिकाणी हा होळी सण संध्याकाळीच साजरा केला जातो विशेष. होळी हा सण निसर्गातील बदललेली अवस्था सुचवणारा सन आहे. होळी या सणाला थंडीचे दिवस म्हणजे हिवाळा हा ऋतू संपलेला असतो, थंडीने त्रासलेली प्राणी, झाडे, फुले ही जोमात उत्साहात आलेली असतात. झाडांची पाने गळून नवीन पानांनी झाडे बहरलेली असतात. झाडांची पाने गळून इकडे तिकडे पाला पाचोळा पडलेला असतो यामुळे सगळीकडे अस्वच्छता दिसते म्हणून पौर्णिमेच्या दिवशी या काड्या-पालापाचोळा जमा करून त्यांची होळी करण्याची परंपरा आपल्या पूर्वजांपासून चालत आलेली आहे.

अजून बातम्या वाचा..

नंदुरबार जिल्हा संघात भुमी क्रिकेट अकॅडमीतील महिला खेळाडु साक्षी शुक्लाची निवड

नंदुरबार जिल्हा संघात भुमी क्रिकेट अकॅडमीतील महिला खेळाडु साक्षी शुक्लाची निवड

नंदुरबार जिल्हा क्रिकेट सोसिएशन येथे नुकत्याच झालेल्या नंदुरबार वरिष्ठ महिला जिल्हा संघाच्या निवड...

read more
अभिमानास्पद – बघा व्हिडिओ – जागतिक युथ वेटलिफ्टींग स्पर्धेत मनमाड च्या आकांक्षा व्यवहारे ला कांस्य पदक

अभिमानास्पद – बघा व्हिडिओ – जागतिक युथ वेटलिफ्टींग स्पर्धेत मनमाड च्या आकांक्षा व्यवहारे ला कांस्य पदक

जागतिक युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत आकांक्षा व्यवहारे ला कांस्यपदक दुर्रेस अल्बेनिया येथे सुरु...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]