जागतिक युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत आकांक्षा व्यवहारे ला कांस्यपदक
दुर्रेस अल्बेनिया येथे सुरु असलेल्या जागतिक युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत आकांक्षा व्यवहारे ची पुन्हा एकदा ऐतिहासिक कामगिरी ४५ किलो वजनी गटात पटकावले कांस्यपदक मनमाड करांच्या शिरपेचात अजुन एक मानाचा तुरा जगातील विविध देशांच्या १२ खेळाडूंमध्ये अतिशय चुरशीची लढत झाली व आकांक्षा किशोर व्यवहारे हिने स्नॅच च्या आपल्या तिसऱ्या प्रयत्नात ६८ किलो वजन उचलून स्नॅच चे कांस्यपदक व क्लिन जर्क मध्ये ८२ किलो असे एकूण १५० किलो वजन उचलून अतिशय चुरशीच्या लढतीत आपल्या सलग तिसऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतासाठी कांस्यपदक पदक प्राप्त करण्याची किमया साधली आहे.
आकांक्षा सध्या इ १० वीत गुरु गोबिंदसिंघ विद्यालयात शिकत असून भारतीय संघात निवड झाल्यामुळे १० वी च्या परिक्षेला ही ती उपस्थित राहू शकली नाही परंतु आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळवित परीक्षा न देण्याचा धाडसी निर्णय सार्थकी ठरविला.
यशस्वी खेळाडूस अल्बेनिया येथे भारतीय संघाची प्रशिक्षक म्हणून उपस्थित असलेली आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पराशर व छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील, मोहन अण्णा गायकवाड,डॉ सुनील बागरेचा, प्रा दत्ता शिंपी,छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर,अध्यक्ष पी जे दिंडोरकर, संचालक नाना कुलकर्णी, प्रसाद पंचवाघ, मुख्याध्यापक आर एन थोरात, उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे, पर्यवेक्षिका सौ पोतदार एस एस,के आर टी विद्यालयाचे प्राचार्य मुकेश मिसर, मुख्याध्यापक दीपक व्यवहारे, श्री गुरु गोविंद सिंग हायस्कुल चे अध्यक्ष बाबा रणजित सिंह जी, प्राचार्य सदाशिव सुतार,महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे उपाध्यक्ष संतोष सिंहासने, सचिव प्रमोद चोळकर, यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.