loader image
[ays_poll id=7]

नांदगाव शहराचा पाणीपुरवठा बंद करणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाचा निषेध : संतोष गुप्ता

Mar 19, 2022

नांदगाव शहरात गिरणा धरण पाणी योजनेअंतर्गत केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठयामध्ये जिल्हा परिषद तर्फे पाणीपट्टी मध्ये अवास्तव वाढ करण्यात आली असून कोणतेही मीटर न लावता अवाजवी पाणीपट्टी नगरपरिषदेच्या माथी मारण्यात आली आहे.नगर परिषदेने वेळोवेळी वस्तुस्थिती प्रमाणे आकारणी करावी अशी मागणी करूनही त्याकडे हेतुपुरस्सर कानाडोळा करणाऱ्या व गीरणा धरण पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा बंद करणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाचा नांदगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष गुप्ता यांनी निषेध केला असून मा. तहसीलदार यांना निवेदन देऊन पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत करावा अशा आशयाचे निवेदन दिले आहे. गीरणा पनियोजनेअंतर्गत होणारा पाणीपुरवठा अचानक थांबविल्या मुळे शहरातील रहिवाशांवर दहेगाव धरणातील अशुध्द तसेच कोणतीही प्रक्रिया न केलेले दुर्गंधीतीयूक्त पाणी प्यावे लागत आहे.अशुध्द पाण्यामुळे नांदगावकर नागरिकांना मोठ्या प्रमाणात पोटाचे विकार व इतर आजार होत असून तातडीने जिल्हा परिषद आणि नगरपरिषद या दोहोंत समन्वय घडवून योग्य तोडगा काढून शहराला शुद्ध पाणीपुरवठा पुन्हा सुरू करावा, आमदार सुहास अण्णा कांदे आणि मा. जिल्हाधिकारी यांनी याकामी पुढाकार घ्यावा अशी मागणी गुप्ता यांनी सदर निवेदनाद्वारे केली आहे.

अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.