Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

अशोक क्रीडा मंडळ आयोजित कबड्डी स्पर्धेला सुरुवात

Mar 20, 2022

नाशिक जिल्हा  कबड्डी  असोसिएशनच्या मान्यतेने अशोक क्रीडा मंडळाच्या यजमान पदाखाली बुधलवाडी येथील क्रीडांगणावर 
फिरता चषक कबड्डी स्पर्धेला आज सुरवात झाली .दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत सुमारे  २२ संघ सहभागी होणार आहे कबड्डीचा थरार पाहण्यासाठी कबड्डीप्रेमींनी गर्दी केली होती

कबड्डीची पंढरी’म्हणून ओळख असलेल्या मनमाड शहरात आज शहर पातळीवरील कबड्डी स्पर्धेला सुरवात करण्यात आली बुधलवाडी येथील अशोक क्रीडा मंडळाच्या बु.युवराज भिकाजी पगारे क्रीडा नगरीमध्ये नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने पार पाडत असलेल्या या स्पर्धेचे उदघाटन  मालेगावचे अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांच्या हस्ते संपन्न झाले. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत मध्ये २२  संघ सहभागी होणार आहे मान्यवरांचे स्वागत निलेश वाघ यांनी केलें नाशिक जिल्हा कबड्डी असो.चे कार्याध्यक्ष राजेंद्र पगारे ,उपनगराध्यक्ष राजेंद्र आहिरे ,माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक , मनमाड पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक प्रल्हाद गिते, सामाजिक कार्यकर्ते अमोल खरे, मुजन्मील इनामदार ,अशोक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अशोक गरुड, गणेश केदारे ,अरुण अंकुश ,अमोल गांगुर्डे , निलेश वाघ आदींसह अशोक क्रीडा मंडळाचे खेळाडू उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

फाल्गुन मास संकष्ट चतुर्थीनिमित्त गुरुवारी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

फाल्गुन मास संकष्ट चतुर्थीनिमित्त गुरुवारी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या...

read more
भीमगर्जना मित्र मंडळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर  सार्वजनिक जयंती उत्सव अध्यक्षपदी राहुल दाणी

भीमगर्जना मित्र मंडळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव अध्यक्षपदी राहुल दाणी

मनमाड : डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातील आंबेडकरी चलवळीचा बालेकिल्ला असलेल्या जमधाडे चौक...

read more
नांदगाव शहरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नारधमावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

नांदगाव शहरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नारधमावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

नांदगाव : प्रतिनिधी येथील अल्पवयीन पीडित मुलीवर अत्याचार करुन तिच्याशी गैर वर्तन करणाऱ्या नराधमास...

read more
उज्जैन येथील प्रसिध्द महाकाल मंदिरात भस्म आरती दरम्यान आग – सुदैवाने जीवितहानी नाही

उज्जैन येथील प्रसिध्द महाकाल मंदिरात भस्म आरती दरम्यान आग – सुदैवाने जीवितहानी नाही

मध्य प्रदेशातील उज्जैन येथील प्रसिद्ध असलेल्या महाकाल मंदिराच्या गर्भगृहात आज सोमवारी भस्म...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]