loader image
[ays_poll id=7]

नादुरुस्त जलवाहिनी, रेल्वे च्या अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट रेल्वे विभाग करणार खर्च

Mar 20, 2022

रेल्वेचे काम सुरू असतांना फुटलेल्या पालिकेच्या मुख्य जलवाहिणीच्या कामाची पाहणी आज रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करत जलवाहिनी दुरुस्तीचा येणारा खर्च रेल्वेतर्फे केला जाणार असल्याचे आश्वासन त्यांनी माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक यांच्यासह शिष्टमंडळाला दिली त्यामुळे जलदगतीने जलवाहिनी दुरुस्तीचे काम झाल्यास शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याचे धात्रक यांनी सांगितले

रेल्वेचे काम सुरू असतांना रेल्वे लाईन खालून गेलेली
मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाटोदा ते वाघदर्डी मुख्य जलवाहिनी फुटली होती जलवाहिनी फुटल्यामुळे शहराला मिळणारे पाण्याचे आवर्तन घेणे थांबले असून शहराला केला जाणाऱ्या पाणीपुरवठ्याचे दिवसही वाढले आहे रेल्वेच्या गलथान कारभारामुळे ही पाईपलाईन फुटली असल्याने माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक यांच्यासह पालिका प्रशासनाने नाराजी व्यक्त केली होती तसेच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ भारती पवार यांना साकडे घालून यात लक्ष देण्याची मागणी केली असता त्यांनी तातडीने सूत्रे हलवत रेल्वे प्रशासनाला सूचना केल्या होत्या त्यानुसार आज रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी सिनियर एडीएन श्री अग्रवाल, एईएन श्री डोळस यांनी घटनास्थळी भेट देऊन फुटलेल्या जलवाहिनीची पाहणी केली यावेळी माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक यांच्यासह भेटलेल्या शिष्टमंडळाला त्यांनी अश्वाशीत केले तसेच जलवाहिनी दुरुस्तीचा जो ही खर्च येईल तो रेल्वे प्रशासनातर्फे केला जाईल तसेच काम युद्धपातळीवर करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले त्यामुळे रेल्वे लाईन खालून गेलेली मुख्य जलवाहिनी मोरीमार्गे न करता ज्या ठिकाणाहून अर्थात रेल्वे लाईन खाली ज्या ठिकाणाहून गेलेली होती त्याच ठिकाणाहून पाईपलाईन नेली जाणार आहे लोखंडी पाईपचा वापर केला जाणार आहे त्यासाठी पालिका प्रशासनाने तयारी दर्शवून कामही सुरू केले होते मात्र रेल्वेच्या हलगर्जीपणामुळे जलवाहिनी फुटल्याने रेल्वे प्रशासनाने त्याचा खर्च उचलण्याची जबाबदारी घेतल्याचे गणेश धात्रक यांनी सांगितले यावेळी मुख्याधिकारी डॉ सचिनकुमार पटेल, सामाजिक कार्यकर्ते विलास कटारे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, शहराध्यक्ष जय फुलवानी, माजी नगरसेवक पिंटू शिरसाठ, कैलास गवळी, शिवसेनेचे शहराध्यक्ष मयुर बोरसे, पाणीपुरवठा अधिकारी अमृत काजवे इतर अधिकारी उपस्थित होते

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.