loader image
[ays_poll id=7]

चिमणी जगवा – पर्यावरण वाचवा

Mar 20, 2022


आज २० मार्च
जागतिक चिमणी दिवस..
चला तर मग चिऊताईला परत बोलावू…
चिऊताई चिऊताई परत ये…
चिमणी हा एक छोटा पण सुंदर पक्षी आहे चिऊताईच्या गोष्टीपासून चिऊताईच्या घासापर्यंत सगळया रुपानं आपल्या आयुष्यात डोकावणारी ही चिमणी जिवंत राहायलाच हवी चिमणी आणि कावळ्याच्या घराची गोष्ट प्रत्येक आईने आपल्या मुलाला सांगितलेली आहे… एक घास चिऊचा… एक घास कावू चा… असं म्हणत आपल्या चिमुकल्याच्या मुखी आईने चार घास भरवले आहेत. चिऊताईची ही पहिली ओळख आईने आपल्याला करून दिलेली… त्यामुळेच चिमण्या या लहानपणापासून मनाच्या जवळ असलेला पक्षी… अशा या चिमण्यांची कमी होत आहे त्याला कारणेही अनेक आहे काँक्रीटीकारण, वृक्षांची संख्या झपाट्याने कमी होत आहे मात्र चिमण्यांसह इतर पक्षांची संख्या कमी होण्यामागची कारणे शोधण्यासाठी प्रयत्न केले जात आहे वाढते प्रदुषण, भ्रमणध्वनीमधून बाहेर पडणारी इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी यामुळे चिमण्यांच्या प्रजोत्पादनावर होणारे परिणाम, विकासाच्या नावाखाली झालेली वक्षतोड, फळधान्यात वापरण्यात येणाऱ्या अतिरिक्त कीटकनाशकाचे प्रमाण, काँक्रटिकरण, कारखान्यातून होणारे प्रदुषण अशी अनेक कारण पुढे येत आहे चिमण्या कमी होण्यामागची निश्चित कारणं शोधण्यासाठी आता जगभरात चळवळ उभारली गेली आहे त्यातीलच एक चळवळ म्हणजे जागतिक चिमणी दिवस त्यामुळे चिमणी वाचविण्यासाठी अनेक हात राबत आहे आणि त्याचे परिणामही जाणवू लागले आहे परंतु त्यासाठी आपण एक प्रयत्न करायला पाहिजे चिमण्यांच्या संवर्धनासाठी झाडे लावून वाढवली पाहिजे, घराबाहेर पाण्याचे भांडे, धान्य ठेवले पाहिजे, परिसरात चिमण्यांसाठी घरटे बांधले पाहिजे चिमणी संवर्धनाचे भान आता प्रत्येक नागरिकाने बाळगले पाहिजे आता उन्हाळा सुरु आहे.. आपण घरातील गॅलरीत पाण्याची वाटी ठेऊन चिमण्यांना आपल्या अंगणात बोलावू शकतो खिडकीत चिमण्यांसाठी बांधलेल्या घरात चिमण्यांची निवासाची व्यवस्था करू शकतो वाटीत तांदळाचे दाणे आणि इतर पदार्थ ठेऊन तिची भूक भागवू शकतो पर्यावरण आणि जीव साखळीत मानाचं आणि महत्वाचं स्थान असलेली चिमणीही जगायलाच पाहिजे चला चिमण्यांना वाचवायचा संकलप करू चिऊताईला परत बोलावू… चिऊताई चिऊताई परत ये…

– अमोल खरे, पक्षीमित्र


अजून बातम्या वाचा..

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

राज्यातील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलंडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम...

read more
पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक  मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

मनमाड (प्रतिनिधी) : पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार विद्यापीठ उभारण्यासाठी नाशिक येथे जागा उपलब्ध...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.