loader image
[ays_poll id=7]

राष्ट्रीय पोषण पंधरवडा २०२२ चे कालावधीत जनजागृतीसाठी तयार केलेले व्हिडिओ सोशल मिडियाचे माध्यमातून जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहोचविणार-सुज्ञा खरे.

Mar 24, 2022

संपूर्ण देशभरात २१ मार्च ते ०४ एप्रिल २०२२ या कालावधीत राष्ट्रीय पोषण पंधरवडा साजरा केला जातो आहे..एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (नागरी) नाशिक-२ अंतर्गत नाशिक,मनमाड, भगूर, येवला या नागरी भागातील १०० अंगणवाडी केंद्र कार्यक्षेत्रात व परिसरातही अंगणवाडी सेविका सोशल मिडियाद्वारे जनजागृती करत आहेत. तसेच प्रकल्प कार्यालयाने दिलेल्या वेळापत्रकानुसार उपक्रमही घेत आहेत. प्रकल्पातील अंगणवाडी सेविकांनी स्वतः मेहनत घेवून जनजागृतीसाठी व्हिडिओ तयार केलेले आहेत. एक टिम तयार करुन या सेविकांनी पोषण पंधरवडाच्या विविध थीमवर तयार केलेले व्हिडिओ हे पालक,परिसरातील नागरिक व इतरही लोकांना जनआंदोलन उभारले जावे या हेतूने व्हाट्सअप,फेसबुक, इंस्टाग्राम, शेअर चॕट, ट्विटर इ. चा वापर करुन पाठविले जात आहेत.या जनजागृतीमुळे पोषणाचे वर्तनात बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.तसेच या प्रयत्नांमुळे सक्षम महिला, सुदृढ बालक व सुपोषित महाराष्ट्र घडेल.अशी माहिती मुख्यसेविका सुज्ञा खरे यांनी दिली.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
.