Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड रेल्वे स्थानक परिसरात बेकायदेशीर रित्या कचरा जाळल्या मुळे रेल्वे स्थानका ची सुरक्षा धोक्यात : डॉ भारती पवार यांचे कडून तातडीने दखल

Mar 25, 2022

मनमाड शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या मध्य रेल्वेच्या मनमाड रेल्वे स्टेशन वर आणि परिसरात दररोज हजारो टन कचरा निर्माण होतो मनमाड रेल्वे स्थानक व परिसरातील स्वच्छता करणे साठी रेल्वे प्रशासन द्वारे सुमारे 04 वर्षा च्या कालावधी साठी रुपये 06 कोटी चे कंत्राट के एस एस या इंदोर मध्य प्रदेश च्या कंपनी ला देण्यात आले आहे ही कंपनी सुमारे 68 स्वच्छता कर्मचारी च्या माध्यमातून ही व्यवस्था चालवते दररोज जमा होणारा कचरा हा रेल्वे सुरक्षा भिंती च्या आत एका ठिकाणी गोळा करून तो वाहतूक द्वारे बाहेर टाकण्याची आर्थिक तरतूद या स्वच्छता कंत्राटमध्ये आहे परंतु या ठेकेदार ने गेल्या काही महिन्यांपासून दररोज चा हा वाहतूक खर्च वाचवण्यासाठी नवीनच शक्कल शोधून काढली हा दररोज चा जमा कचरा वाहतूक नि बाहेर न फेकता रेल्वे सुरक्षा भिंतीच्या आतील परिसरातच जाळण्याचा प्रकार सुरू केला त्यामुळे ह्या जळलेल्या कचऱ्यामुळे बोहरी कंपाउंड, बुऱ्हानी पार्क ,गार्डर शॉप परिसरातील रहिवासी नागरिकांना ना जळीत वायू प्रदूषण चा प्रचंड त्रास सुरू झाला आहे विशेषतः जेष्ठ नागरिक लहान बालके ,आजारी रुग्ण हे या त्रासाने त्रस्त झाले आहेत या परिसरातील नागरिकांनि ही बाब संबंधित रेल्वे आरोग्य अधिकाऱ्यांन च्या लक्षात आणून दिली आणि अनेकांना तक्रार केली परंतु रेल्वे प्रशासनाने या बाबत पूर्ण दुर्लक्ष केले म्हणून या नागरिकांनि या संबंधी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्य मंत्री डॉ भारती पवार यांचे कडे तक्रार केली डॉ पवार यांनी या गंभीर घटनेची तातडीने दखल घेतली केंद्रीय मंत्री डॉ भारती पवार यांचे मार्गदर्शनाने त्यांचे प्रतिनिधी भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष तथा दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद क्षेत्रीय समिती सदस्य नितिन पांडे आणि भाजपा मनमाड शहर अध्यक्ष तथा दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागीय समिती सदस्य जयकुमार फुलवाणी यांनी या बाबतीत संबंधित जबाबदार रेल्वे अधिकाऱ्यांना व कंत्राटदार ला कडक शब्दात या जाब विचारला आणि रेल्वे स्थानका जवळील रहिवाशांच्या आरोग्य ला मोठा धोका निर्माण झाला असल्याचे अधिकाऱ्यांन च्या लक्षात आणून दिले आणि रेल्वे सुरक्षा भिंती च्या आत हा कचरा दररोज जाळला जातो हे रेल्वे साठी मोठ्या भीषण अपघाताला निमंत्रण देण्यात येत असल्याचा आरोप नितीन पांडे करीत अधिकारी कंत्राटदार यांची चांगलीच कानउघडणी केली संबंधित स्वच्छता कंत्राटदार ने याबाबत रेल्वे सुरक्षा बला ला कचरा अज्ञान व्यक्ती जाळते अशी दिशाभूल करणारी तक्रार केली आहे पण रेल्वे स्थानक सुरक्षा आणि रेल्वे प्रवासी रेल्वे स्थानका लगत च्या रहिवाशांन च्या आरोग्य सुरक्षे बाबतीत ही गंभीर बाब असून या बाबतीत स्वच्छता कंत्राटदार वर त्वरित दंडात्मक कार्यवाही करण्यात येऊन रेल्वे सुरक्षा बलाने या बाबत गंभीर तेने कार्यवाही करावी अशी मागणी या प्रसंगी नितीन पांडे व जयकुमार फुलवाणी यांनी केली या बैठकीत वरील पदाधिकाऱ्यांन सह मनमाड रेल्वे स्थानका चे मुख्य वाणिज्य निरीक्षक एस एस मीणा आरोग्य अधिकारी शहारे भाजपा मनमाड शहर सरचिटणीस एकनाथ बोडखे तर अंबादास हटकर कंत्राटदार कंपनी चे व्यवस्थापक दिवेदी उपस्थित होते वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी याबाबत दखल घेतली असून दोषीवर कार्यवाही करण्यास सांगितले आहे

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या राष्ट्रीय सेवा...

read more
मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा व गणेश उत्सवा तील प्रथम मानाचा गणपती म्हणून...

read more
श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

  नाशिक येथे मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र...

read more
बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

या गणेशोत्सवात लाडक्या श्रीगणेशाच्या आगमनाने दहा दिवस सर्वत्र प्रसन्नमय वातावरण झाले. बाप्पाच्या...

read more
बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]