loader image
[ays_poll id=7]

सटाणा – देवळा – मंगरूळ महामार्ग : केंद्राकडून ४२८.८० कोटी मंजूर

Mar 25, 2022

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना . डॉ . भारती पवार यांच्या माध्यमातून आ . डॉ . राहुल आहेर यांनी केलेल्या पाठपुराव्यातुन सटाणा – देवळा – मंगरूळ महामार्गाच्या कामासाठी केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री ना नितीन गडकरी यांनी ४२८.८० कोटीची दिली मंजुरी दिल्याची माहिती आमदार डॉ राहुल आहेर यांनी दिली .

चांदवड देवळा मतदारसंघातील सटाणा – देवळा, मंगरूळ -चांदवड ,मनमाड -येवला, कोपरगाव या एन . एच ७५२ जी राष्ट्रीय महामार्गामधील चांदवड ते मनमाड ह्या लांबीतील रस्त्याच्या कामास २०१ ९ मध्ये मंजुरी मिळाली असून ,काम प्रगतीपथावर असतांनाच एन . एच ७५२ जी ह्या राष्ट्रीय महामार्गातीलच सटाणा – देवळा – मंगरूळ या उर्वरित लांबीची अवस्था अत्यंत बिकट झाली असल्याबाबतची व सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात घडत असल्याची बाब मागील वर्षी ३ ऑक्टोबर २०२१ रोजी नाशिक दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आ . डॉ . राहुल आहेर यांनी आणून दिली होती .

यासंदर्भात ना गडकरी यांनी सदर रस्त्याबाबत संबंधित अधिकारी यांच्याकडून माहिती घेत लवकरच रस्त्याच्या कामाला मंजुरी देण्यात येईल असे आश्वासित केल्यानंतर आ . डॉ . राहुल द आहेर यांनी तसेच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना . डॉ . भारती पवार यांनी देखील याकामी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवल्यामुळे आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना . नितीन गडकरी यांनी सटाणा ते मंगरूळ या ३७. १४ किमी रस्त्याच्या कामास ४२८.८० कोटी रुपयांची मंजुरी दिली असून, यामध्ये सटाणा ते देवळा या २०. १२ किमी लांबीचा व देवळा ते मंगरूळ ह्या १७.०२ किमी लांबीचे काम होणार असून संपूर्ण लांबीत सिमेंट काँक्रीट रस्ता होणार असल्याची माहिती शेवटी आ . डॉ . राहुल आहेर यांनी दिली .

अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.