Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ

Mar 26, 2022

मनमाड : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने भीमोस्तव 22 अंतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चषक भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा आज भगवान महर्षी वाल्मिकी क्रीडांगण येथे मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.

दरवर्षी डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांच्या जयंतीनिमित्ताने मा.नगराध्यक्ष श्री राजेंद्र पगारे यांच्या मार्गदर्शनाने भीमोस्तवाचे आयोजन करण्यात येत असते , या मध्ये विविध सामाजिक , सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. यंदाच्या वर्षी देखील या उत्सवामध्ये विविध कार्यक्रमांचे अयोजन करण्यात आले असुन , या उत्सवातीलच एक कार्यक्रम असणारा भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ आज करण्यात आला. या क्रिकेट स्पर्धेमध्ये नाशिक जिल्हयासह बाहेरील जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील नामवंत 16 संघ सहभागी झाले असुन पुढील पाच दिवस या संघांमध्ये क्रिकेटचे सामने रंगणार आहे. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 1,00,000 लाख रुपये , द्वितीय 50,000 हजार रुपये , तृतीय 30,000 हजार रुपये , चतुर्थ 20,000 हजार रुपये आणि चषक तसेच या बरोबर अनेक इतर आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहे . या सर्व क्रिकेट सामन्याचे यु-ट्युब द्वारे थेट प्रेक्षपण करण्यात येणार आहे.

आजच्या या क्रिकेट स्पर्धेच्या शुभारंभा प्रसंगी शहरातील अनेक मान्यवर आणि क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

मनमाड येथे रविवार दिनांक १०/०८/२०२५ रोजी जय भवानी अद्यावत व्यायामशाळा येथे करण्यात आले आहे नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]