Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

लाँड्री चालक श्री मंगेश परदेशी यांची इमानदारी;भाविकाचे पैसे केले परत

Mar 26, 2022

मनमाड शहर हे मध्य रेल्वेचे एक प्रमुख रेल्वे स्थानक आणि भारतातील शीख धर्मियांचा प्रमुख गुरुद्वारा तसेच शिर्डी येथील तीर्थस्थळ जवळ असल्याने देशातील अनेक भागातून भाविक हे मनमाड येथे येत असतात.

मनमाड गुरुद्वारा येथे असेच पंजाब येथील भाविक हे काल दर्शनासाठी आले असता , त्यांनी आपले कपडे इस्त्री करण्यासाठी दत्त मंदिर रोड येथील रुद्र हनुमान मंदिरासमोर असलेल्या लाँड्री चालक श्री मंगेश परदेशी यांच्याकडे देऊन ते शिर्डी येथे दर्शनासाठी गेले , लाँड्री चालक श्री परदेशी यांनी या भाविकांचे कपडे इस्त्रीसाठी घेतले असता त्यांच्या लक्षात आले की , पॅन्टच्या खिशामध्ये काही पैसे आहे त्याने ते तसेच न मोजता बाजुला ठेऊन त्या भाविकाची सायंकाळ पर्यंत वाट बघितली , सायंकाळी या भाविकांच्या लक्षात आले की आपले पैसे आपल्याकडे नाही तेव्हा ते थोडे गोंधळलेल्या अवस्थेतच श्री परदेशी यांच्याकडे पैशांची विचारणी करायला आले असता , श्री परदेशी यांनी अत्यंत इमानदारीने कुठलेही लालच न करता ते पैसे जशाच्या तसे त्या भाविकाला परत केले , आणि त्या भाविकाकडुनच समजलेकी ते जवळ-जवळ 15 ,000 रुपये होते.

श्री मंगेश परदेशी यांची परिस्थिती तशी बेताचीच दिवसाला आपल्या व्यवसायातून ते साधारण 100 ते 150 रुपये मिळवत असेल तरी कधी याही पेक्षा कमी परंतु या परिस्थितीत देखील त्यांनी एवढे पैसे पाहुन कुठल्याही प्रकारचे लालच न करता अत्यंत इमानदारीने त्या भाविकाचे पैसे परत केले , आपले पैसे आपल्याला परत मिळालयाचे पाहुन त्या भाविकाने आणि त्यांच्या संपुर्ण परिवाराने श्री मंगेश परदेशी यांचे आभार मानुन समाधान व्यक्त केले आणि लाँड्री चालक श्री मंगेश परदेशी यांनी आपल्या या कृतीतुन सिद्ध करून दिले की आजच्या या आपला स्वतःचा फायदा बघणाऱ्या दिवसात देखील माणुसकी आणि इमानदारी जिवंत आहे.

अजून बातम्या वाचा..

वारकरी संप्रदायातील कीर्तनकार यांनी आमदार सुहास अण्णा कांदे यांचा सत्कार करत मानले आभार

वारकरी संप्रदायातील कीर्तनकार यांनी आमदार सुहास अण्णा कांदे यांचा सत्कार करत मानले आभार

नांदगाव - सतत वारकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे कुटुंबप्रमुख या नात्याने आज तालुक्यातील...

read more
मनमाड बस डेपोत  इंधन बचत मासिक कार्यक्रमाचे लेखक पत्रकार संदीप देशपांडे यांच्या हस्ते उदघाटन .……

मनमाड बस डेपोत इंधन बचत मासिक कार्यक्रमाचे लेखक पत्रकार संदीप देशपांडे यांच्या हस्ते उदघाटन .……

मनमाड इंधन बचाव ही काळाची गरज असून पुढच्या पिढीसाठी इंधन साठा राहील, हा विचार करून इंधनाचा...

read more
विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनण्याची एक सुवर्णसंधी :डॉ भारती पवार

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनण्याची एक सुवर्णसंधी :डॉ भारती पवार

त्रंबकेश्वर तालुक्यातील देवडोंगरा गावांमध्ये विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम कार्यक्रम...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]