Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात स्पर्धा परीक्षेचे महत्व या विषयावर व्याख्यान संपन्न

Mar 27, 2022

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे दिनांक 26 मार्च 2022 रोजी दृकश्राव्य माध्यमातून वाणिज्य विभागातर्फे ” स्पर्धा परीक्षेचे महत्व या विषयावर व्याख्यान” आयोजित करण्यात आले. याप्रसंगी मुख्य अतिथी प्रा.भूषण थेटे , एल व्ही एच् पंचवटी कॉलेज नाशिक. हे उपस्थित होते.
स्पर्धा परीक्षा ही काळाची गरज असून त्याबाबत पूर्व नियोजन करणे व सर्वांगीण अभ्यास करणे आवश्यक असते असे मत व्याख्यानात प्राध्यापक भूषण थेटे यांनी मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे माननिय प्राचार्य डॉ.ए. व्ही.पाटील यांनी भुषविले. याप्रसंगी वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख डॉ. एस डी थोरे यांनी आपले प्रास्ताविक व्यक्त केलेअसून त्यांनी ” वाणिज्य विभागात होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली . तर सुत्रसंचालान प्राध्यापिका श्रीमती.ए.एस छाजेड व अतिथी परिचय आणि आभार प्रदर्शन प्रा. ए.एस मुसळे यांनी केले . महाविद्यालयाचे माननीय उपप्राचार्य डॉ.प्रमोद आंबेकर, यांनी मनोगतात सांगितले की, विद्यार्थ्यांना स्पर्धेशिवाय पर्याय नाही त्याकरिता त्यांनी विविध कौशल्य अंगीकारणे आवश्यक आहे. डॉ.थोरात, प्राध्यापिका कविता काखंडकी , डॉ.इंगळे, पर्यवेक्षक डॉ.सतीश तांबे, कुलसचिव समाधान केदारे, डॉ.मिलिंद अहिरे,डॉ. शेंडगे, प्रा. व्ही एस नजरधने यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली व कार्यक्रम यशस्वी केला.

अजून बातम्या वाचा..

वारकरी संप्रदायातील कीर्तनकार यांनी आमदार सुहास अण्णा कांदे यांचा सत्कार करत मानले आभार

वारकरी संप्रदायातील कीर्तनकार यांनी आमदार सुहास अण्णा कांदे यांचा सत्कार करत मानले आभार

नांदगाव - सतत वारकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे कुटुंबप्रमुख या नात्याने आज तालुक्यातील...

read more
मनमाड बस डेपोत  इंधन बचत मासिक कार्यक्रमाचे लेखक पत्रकार संदीप देशपांडे यांच्या हस्ते उदघाटन .……

मनमाड बस डेपोत इंधन बचत मासिक कार्यक्रमाचे लेखक पत्रकार संदीप देशपांडे यांच्या हस्ते उदघाटन .……

मनमाड इंधन बचाव ही काळाची गरज असून पुढच्या पिढीसाठी इंधन साठा राहील, हा विचार करून इंधनाचा...

read more
विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनण्याची एक सुवर्णसंधी :डॉ भारती पवार

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनण्याची एक सुवर्णसंधी :डॉ भारती पवार

त्रंबकेश्वर तालुक्यातील देवडोंगरा गावांमध्ये विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम कार्यक्रम...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]