loader image
[ays_poll id=7]

आयपीएल पहायचेय ; हे आहेत मोबाईल कंपन्यांचे प्लॅन्स

Mar 28, 2022

भारतात क्रिकेटप्रेमी हे अनेक सामन्यांना स्टेडियममध्ये उपस्थित राहून आपली हौस पूर्ण करतात तर काही घरबसल्या क्रिकेट सामन्यांचा आनंद घेतात. क्रिकेट चाहत्यांसाठी विविध टीव्ही चॅनेल्स क्रिकेटचे लाईव्ह प्रक्षेपण करत असतात. पण सध्याच्या काळात तुम्हाला तुमच्या मोबाईलवरही क्रिकेट सामने पाहता येतात. TATA IPL ही 26 मार्चपासून सुरु झाली आहे. सध्या हे सामने Disney + Hotstar वर लाईव्ह दाखवले जातात. ही आयपीएल आता तुमच्या मोबाईलवर तुम्ही पाहू शकता, पण यासाठी तुम्हाला माहीत हवं की कोणता रिचार्ज तुम्हाला परवडू शकतो .

IPL 2022 ची सुरुवात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यातील पहिल्या सामन्याने झाली. असे अनेक सामने तुम्हाला पाहण्यासाठी जिओ, एअरटेल आणि वोडाफोनने क्रिकेट चाहत्यांसाठी काही रिचार्ज प्लॅन्स आणले आहेत. त्याने तुम्ही मोबाईलवर आयपीएल पाहू शकता. या प्लॅनमध्ये Disney प्लस Hotstar सबस्क्रिप्शनसोबतच तुम्हाला अमर्यादित डेटा, मोफत कॉलिंग, एसएमएस आणि इतर लाभ दिले जातील.

एअरटेल यूजर्ससाठी प्लॅन

देशातील अजून एक टॉपची टेलिकॉम कंपनी एअरटेल 499 रुपयांचा रिचार्ज प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह Disney प्लस Hotstar सदस्यत्व देते. त्यामध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा, 100SMS, अनलिमिटेड कॉलिंग मिळते.आहे. यासोबतच विविध सिनेमे, वेबसीरीज पाहण्यासाठी तुम्हाला Airtel Amazon Prime Video ची 30 दिवसांसाठी मोफत ट्रायल (Mobile Edition Free Trial) मिळते. तसेच 3 महिन्यांसाठी Apollo 24|7 Circle, Shaw Academy Free online courses, FASTag आणि Wink Music वर म्युझिक, हॅलोट्यून्स, लाईव्ह कॉन्सर्ट्स & पॉडकास्टचा लाभ मिळेल.

जिओ यूजर्ससाठी प्लॅन

आपल्याला IPL चे सामने मोफत पाहायचे असतील तर Jio चा 499 रुपयांचा रिचार्ज प्लॅन तुम्ही टाकू शकता. यामध्ये अनेक फायदे मिळतात जे अन्य रिचार्ज प्लॅन्समध्येही येतात. तुम्ही Disney प्लस हॉटस्टार चे सदस्यत्व घेऊन आयपीएल मोफत पाहू शकता. Disney प्लस Hotstar सदस्यत्व असलेल्या मोबाईल वापरकर्त्यांसाठी हा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन आहे. क्रिकेट पॅकसह, वापरकर्त्यांना 28 दिवसांसाठी दररोज 2GB अमर्यादित डेटा, मोफत कॉलिंग, दररोज 100SMS, Jio TV, Jio Cinema, Jio Mart च्या वस्तूंवर 20 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट असे फायदे मिळतील. Disney + Hotstar सोबत Jio वापरकर्त्यांना चार प्लॅन मिळतात जे दररोज 2GB डेटा देतात.

व्होडाफोन-आयडीया यूजर्ससाठी प्लॅन

भारतातील आणखी एक मोठी कंपनी Vodafone Idea म्हणजेच Vi ने देखील 499 रुपयांचा रिहारज प्लॅन सादर केला आहे. 499 रुपयांच्या रिचार्जवर, तुम्हाला Disney + Hotstar सब्स्क्रिप्शन 1 वर्षांसाठी मोफत मिळणार आहे. अनलिमिटेड कॉलिंग, फ्री 100 SMS आणि दररोज 2GB डेटा 28 दिवसांच्या वैधतेसोबत मिळेल. यामुळे तुम्हाला आयपीएलचा मनसोक्त आनंद घेता येणार आहे. दररोजच्या 2 जीबी डेटावर तुम्ही सहजरित्या हाय क्वालिटीमध्ये आयपीएल सामने पाहू शकणार आहात. वीकेंड डेटा रोलओव्हरचा लाभही तुम्ही घेऊ शकता.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

सुवा फिजी येथे १४ ते २१ सप्टेंबर २०१४ रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ चँपियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका मुलाखती दरम्यान काँग्रेस भारतात सत्तेत आल्यास आरक्षण काढून टाकू...

read more
कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

नांदगांव : दि १३ मारुती जगधने दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम...

read more
लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड व लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये कर्करोग (कॅन्सर) जनजागृती कार्यक्रम संपन्न.

लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड व लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये कर्करोग (कॅन्सर) जनजागृती कार्यक्रम संपन्न.

  मनमाड :-लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड,लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी व कॅन्सर सेंटर अमेरिका (CCA)...

read more
.