मेष :- व्यावसायिक अडचणींवर मात करता येईल. योग्य नियोजनावर भर द्यावा.
वृषभ :- मेहनतीनुसार कमी अधिक फळ मिळेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
मिथुन :- विरोधकांच्या कारवाया ओळखा. तुटपुंज्या ज्ञानावर खुश होऊ नका.
कर्क :- कामाची घाई करू नका. अतिलोभ टाळावा. मोठ्या गुंतवणुकीत तज्ञांचा सल्ला घ्यावा.
सिंह :- जमिनीचे व्यवहार पूर्णत्त्वाला जातील. आळस झटकून कामाला लागावे.
कन्या :- व्यावसायिक संघर्ष लक्षात घ्यावा. परिस्थितीचा योग्य अंदाज घ्यावा.
तूळ :- यश डोक्यात जाऊ देऊ नका. कसलीही घाई उपयोगाची ठरणार नाही.
वृश्चिक :- संमिश्र परिस्थिती लक्षात घ्यावी. सरकारी मदत मिळू शकेल. प्रलोभनापासून दूर राहावे.
धनू :- घरगुती खर्चावर लक्ष ठेवा. क्रोधावर नियंत्रण ठेवावे. कामानिमित्त प्रवास करावा लागेल.
मकर :- वडीलधार्यांचा योग्य पाहुणचार करावा. एकांत टाळण्याचा प्रयत्न करावा. उधारीचे व्यवहार टाळावेत.
कुंभ :- कामाचा व्याप लक्षात घ्यावा. कागदपत्रे जपून ठेवावीत. मोठ्या लोकांच्या ओळखी होतील.
मीन :- चांगला आर्थिक लाभ होऊ शकतो. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये.




