Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

राष्ट्रीय पोषण पंधरवडा : अंगणवाडी सेविका राबवित आहे विविध प्रकल्प

Mar 30, 2022

राष्ट्रीय पोषण पंधरवडा २०२२ चे कालावधीत जनजागृतीसाठी नाशिक शहरातील अंगणवाडीताईंनी तयार केले व्हिडिओ

सविता तायडे अंगणवाडी सेविका एकात्मिक बाल विकास सेवा योजना (प्रकल्प) नागरी नाशिक-२

संपूर्ण देशभरात २१ मार्च ते ०४ एप्रिल २०२२ या कालावधीत राष्ट्रीय पोषण पंधरवडा साजरा केला जातो आहे..एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (नागरी) नाशिक-२ अंतर्गत नाशिक,मनमाड, भगूर, येवला या नागरी भागातील १०० अंगणवाडी केंद्र कार्यक्षेत्रात व परिसरातही अंगणवाडी सेविका सोशल मिडियाद्वारे जनजागृती करत आहेत..तसेच प्रकल्प कार्यालयाने दिलेल्या वेळापत्रकानुसार उपक्रमही घेत आहेत… प्रकल्पातील अंगणवाडी सेविकांनी स्वतः मेहनत घेवून जनजागृतीसाठी व्हिडिओ तयार केलेले आहेत..एक टिम तयार करुन या सेविकांनी पोषण पंधरवडाच्या विविध थीमवर तयार केलेले व्हिडिओ हे पालक,परिसरातील नागरिक व इतरही लोकांना जनआंदोलन उभारले जावे या हेतूने व्हाट्सअप,फेसबुक, इंस्टाग्राम, शेअर चॕट, ट्विटर इ. चा वापर करुन पाठविले जात आहेत..या जनजागृतीमुळे पोषणाचे वर्तनात बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहे..जल व्यवस्थापन व सॕम -मॕम बालकांची काळजी या विषयावरील व्हिडीओ तयार करण्यासाठी सुहासिनी कसोटे,पुष्पा वडजे, ज्योती चौधरी, कुसुम आहेर, किर्ती पाचपांडे, पद्मा निरभवणे,अलका लोखंडे, वंदना हिवाळे, सविता तायडे, वैशाली चौधरी,योगिता गायकवाड यांनी सहभाग नोंदविला..या प्रयत्नांमुळे सक्षम महिला, सुदृढ बालक व सुपोषित महाराष्ट्र घडेल….अशी माहिती सविता तायडे यांनी दिली..

अजून बातम्या वाचा..

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

  दिनांक 17 मंगळवार रोजी अनकाई येथे रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक आणि रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]