Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सौ.कमलाबाई माणिकचंद कासलीवाल प्राथमिक विद्यालयात गुढीपाडव्यानिमित्त शैक्षणिक गुढी चे उत्साहात सादरीकरण

Apr 1, 2022


गुढीपाडवा हा सण चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षांमध्ये येतो . हिंदूंमध्ये वर्षभरात येणारे साडेतीन मुहूर्त अतिशय शुभ मानले जातात. या साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त गुढीपाडवा हा आहे.पाडवा या सणा पासूनच मराठी नववर्षाची सुरुवात देखील होते .भारतातील सर्व लोक गुढीपाडवा हा सण खूप मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतात.
सर्व विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात शैक्षणिक गुढी उभारली .श्रीमती शिंदे मॅडम यांनी गुढीपाडवा या सणाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी हिंदू नववर्षाचा पहिला दिवस यानिमित्ताने मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. सर्व विद्यार्थ्यांनी कार्डशिट, माउंट बोर्ड यांपासून गुढी तयार केली. गुढी भोवती शैक्षणिक संबोधाच्या पट्ट्या लावण्यात आल्या. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सावंत सर , माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक गोरख डफाळ सर उपस्थित होते. प्रशासक पी.पी.गुप्ता ,चेअरमन सुनीलकुमार कासलीवाल,विजय चोपडा, महेंद्र चांदीवाल ,यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. शिक्षक सिद्धार्थ जगताप,अभिजीत थोरात, विजय जाधव, ईश्वर फणसे, निलोफर पठाण, धन्वंतरी देवरे, जयश्री चोळके,अनीता पवार,वैशाली शिंदे आदींनी परिश्रम घेतले.अशाप्रकारे गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

अजून बातम्या वाचा..

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

  दिनांक 17 मंगळवार रोजी अनकाई येथे रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक आणि रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]