निसर्गाला नवजीवन देणाऱ्या वसंत ऋतूचे आगमनाबरोबरच नवा उत्साह नव्या आशा निर्माण करणारा सण चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा.
चैत्र महिन्यात मराठी महिन्याची सुरुवात होते. नववर्षाची सुरुवात होणारा हा मंगलमय दिवस. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला हा मंगल दिवस. भारतात हा सण सर्वत्र साजरा होतो. काठीच्या वरच्या टोकाला चांदीचे वा तांब्याचे पात्र उलटे ठेऊन सुंदर रेशमी वस्त्र, कडुलिंबाची व आंब्याची पाने असलेली फांदी,साखरीची गाठ,माळ,अशी गुढी घरोघरी उभारली जाते.
हा दिवस नवसंकल्प करण्याचा,वाईट गोष्टी विसरून नवं वर्ष आनंदात जावं म्हणून प्रार्थना करण्याचा ,गोड धोड खाऊन आनंद साजरा करून नव्या चाहुलीचं आनंदाच्या पाऊल खुणांचं स्वागत करण्याचा मंगलमय दिवस.
सर्वांना फलक रेखाटनातून या मराठी नूतन वर्षाच्या मऱ्हाठमोळ्या हार्दिक शुभेच्छा !!
- देव हिरे.(कलाशिक्षक, ‘शिक्षण मंडळ भगूर’ संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव.ता.चांदवड.जि.नाशिक)












