Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड येथे श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट दिन सोहळा उत्साहात साजरा

Apr 3, 2022

मनमाड शहरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. इ.स. १४५९ च्या सुमारास (माघ वद्य १, शके १३८०)श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ह्यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैल यात्रेचे निमित्त साधून ते कर्दळीवनात अदृश्य झाले. ह्या कर्दळी वनात सुमारे ३०० वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली. ह्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ निर्माण केले. एके दिवशी उद्धव नावाचा लाकूडतोडया त्याच कर्दळीवनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुर्‍हाड निसटली व ती वारूळावर पडली. उद्धवाचे निमित्त साधून स्वामी महाराजांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रगट व्हायचे होते. कुर्‍हाड वारूळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक आजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रगट झाली; तेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज होत असे मानले जाते. सबसे बडा गुरू, गुरूसे बडा गुरू का ध्यास, और उससे भी बडे श्री स्वामी समर्थ महाराज! तसेच स्वामी महाराजांनी त्यांच्या भक्तांना अभयदान दिले, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे! अशा शब्दांंमधे स्वामी समर्थांंची महती वर्णन केली जाते.इसवी सन १८५६ मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला व तिथल्या बावीस वर्षांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले. येथे त्यांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले.

शहरातील दत्त मंदिर येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्रामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते , सकाळी महाआरती , श्री स्वामी समर्थ साराअमृत ग्रंथाचे वाचन करून भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील श्री स्वामी समर्थ मंदिर येथे देखील प्रगट दिनानिमित्त मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करून भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

या दोन्ही ठिकाणी श्री स्वामी समर्थ भक्त परिवार , श्री स्वामी सेवक आणि शहरातील भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

(बघा व्हीडीओ) आम्ही गद्दार नव्हे,आमचा उठाव नेतृत्वा विरोधात : आमदार सुहास कांदे यांचे आदित्य ठाकरेंना प्रत्यूत्तर

शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद दौरा सुरू केल्यानंतर काल पासून ते...

read more
आदित्य ठाकरे साधणार मनमाडच्या शिवसैनिकांशी संवाद ; तर आमदार कांदे देणार ठाकरेंना निवेदन

आदित्य ठाकरे साधणार मनमाडच्या शिवसैनिकांशी संवाद ; तर आमदार कांदे देणार ठाकरेंना निवेदन

शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व अशा बंडाळीनंतर ४० आमदार आणि १२ खासदार शिंदे गटात सामील झाल्याने...

read more
मनमाडला धाडसी चोरी ; चोरांनी घरातील सोन्याच्या वस्तुंसह सह चार चाकी वाहनाची केली चोरी

मनमाडला धाडसी चोरी ; चोरांनी घरातील सोन्याच्या वस्तुंसह सह चार चाकी वाहनाची केली चोरी

मनमाड शहरात नांदगाव रोड वरील माऊली नगर मध्ये झालेल्या धाडसी घरफोडीत सोन्याच्या वस्तूंसह चार चाकी...

read more

(बघा व्हिडीओ)मनमाड – दहेगाव जवळ चार वाहनांचा विचित्र अपघात : काही काळ वाहतूक खोळंबली

मनमाड - येथून पाच किलोमीटरवरील दहेगांव शिवाराजवळील मनमाड  नगरपालिकेच्या कचरा डेपोजवळ,चोपडा यांचे...

read more
केंद्र सरकारने राष्ट्रीय पातळीवर “हर घर संविधान” हा उपक्रम राबवावा : संविधान साक्षरता-संवर्धन अभियानाची राष्ट्रपती,प्रधानमंत्री यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी

केंद्र सरकारने राष्ट्रीय पातळीवर “हर घर संविधान” हा उपक्रम राबवावा : संविधान साक्षरता-संवर्धन अभियानाची राष्ट्रपती,प्रधानमंत्री यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी

भारतीय स्वातंत्र्याची पंचाहत्तरी देशभर साजरी होत असताना ज्या भारतीय संविधानामुळे भारत हे संघराज्य...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]