loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : ०४ एप्रिल २०२२ !

Apr 4, 2022


मेष :- मनातील बदलांकडे लक्ष द्या. कामाच्या ठिकाणी स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. हेतु मनात धरून कामे कराल.

वृषभ :- आलेल्या संधी सोडू नका. स्वत:चा फायदा लक्षात घेऊन वागाल. ठोस निर्णयाची गरज आहे.

मिथुन :- स्थिर चित्ताने कामे सुरू करावीत. सुंदर वस्त्रे परिधान कराल. मनातील नकारात्मक विचार दूर करा.

कर्क :- संबंधितांचे गैरसमज होऊ शकतात. वादापासून दूर राहा. आरोग्याची काळजी घ्यावी.

सिंह :- मनाची द्विधावस्था टाळावी. नवीन कार्य हाती घेताना संपूर्ण विचार करावा. सहलीचा बेत आखाल.

कन्या :- वरिष्ठ अधिकार्‍यांकडून फायदा होईल. कामासाठी बाहेर गावी जावे लागू शकते. सरकारी कामासाठी वेळ द्यावा लागेल.

तूळ :- जबाबदारीत वाढ होईल. धार्मिक स्थळाला भेट द्याल. मुलांविषयी चिंता लागून राहील.

वृश्चिक :- रागावर नियंत्रण ठेवावे. अनैतिक कृत्ये करू नयेत. राजकीय खेळ खेळू नका.

धनू :- स्वत:चे निर्णय स्वत: घ्या. राजकीय गोष्टींपासून दूर राहावे. प्रवासाचा बेत आखाल.

मकर :-  व्यवसायात प्रगती होईल. वैचारिक बदल दिसून येईल. सहकारी मदत करतील.

कुंभ :- नवीन सुरुवात करण्याची योग्य वेळ. मत परिवर्तन होण्याची शक्यता आहे.

मीन :- मनाची मरगळ दूर सारावी. वाहन जपून चालवावे. महत्त्वाचे दस्तऐवज सांभाळून ठेवावेत.


अजून बातम्या वाचा..

.