loader image
[ays_poll id=7]

वाढीव बिल ;वीज वितरण कार्यालयासमोर करणार आत्मदहन

Apr 5, 2022


वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे परिसरातील पानेवाडी येथील किसनाबाई आव्हाड या महिला शेतकऱ्यांचा गेल्या वर्षापासून ट्रांसफार्मर जळालेला असतानाही वापरलेल्या युनिटपेक्षा जास्त बिल येत असल्याने सदरच्या महिला शेतकऱ्यावर शेती पडित ठेवण्याची वेळ आली आहे. याबाबत तक्रार करूनही संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ वीज वितरण कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा महिला शेतकर्‍याने दिला आहे.
दरम्यान शेती पडीत असल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.याबाबत अनेक तक्रारी करूनही जाणीव पूर्वक दुरक्ष केले जात आहे.
किसनाबाई शिवाजी आव्हाड यांनी म्हटले आहे की,सदर शेतीच्या ठिकाणी गेल्या एक वर्षापूर्वी दहा हॉसपॉवरचा ट्रांसफार्मर वीज वितरण कंपनीने बसवलेला आहे. मात्र बसवल्यानंतर तो काही दिवसात जळाला या कालावधीमध्ये माझ्या शेती वरील वीज पंपाचा फक्त १०६ युनिट वापर झालेला आहे.परंतु याबाबत वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कळविल्यानंतर गेल्या एक वर्षापासून अंदाजे २४१८ युनिट वापर दाखवून ३४ हजार रुपये बिल आमच्या हातात देत आहे.ते बिल ही आम्ही भरण्यास तयार आहे.मात्र वापर झालेले रितसर बिल व नवीन ट्रांसफार्मर दिला जात नसल्यामुळे आम्ही वारंवार याबाबत मागणी केली असून कुठलीही दखल घेतली जात नाही.तर वापर फक्त ३ हाउसपॉवरचा बिल मात्र ४ हाउसपॉवरचे दिल्या जात असल्याने त्यांच्या गलथान कारभारामुळे माझ्यासारख्या गरीब शेतकऱ्यावर शेती पडीत ठेवण्याची वेळ आली आहे.तसेच याबाबत मनमाड येथील साहयक अभियंता यांच्याकडे रिडिंग प्रमाणे बिल मिळावे व नवीन ट्रान्सफार्मर देण्यात यावा अशी मागणी किसनाबाई शिवाजी आव्हाड यांनी केली आहे.


अजून बातम्या वाचा..

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या...

read more
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून "मराठा लष्करी भूप्रदेश" म्हणून मानांकन...

read more
.