वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे परिसरातील पानेवाडी येथील किसनाबाई आव्हाड या महिला शेतकऱ्यांचा गेल्या वर्षापासून ट्रांसफार्मर जळालेला असतानाही वापरलेल्या युनिटपेक्षा जास्त बिल येत असल्याने सदरच्या महिला शेतकऱ्यावर शेती पडित ठेवण्याची वेळ आली आहे. याबाबत तक्रार करूनही संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ वीज वितरण कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा महिला शेतकर्याने दिला आहे.
दरम्यान शेती पडीत असल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.याबाबत अनेक तक्रारी करूनही जाणीव पूर्वक दुरक्ष केले जात आहे.
किसनाबाई शिवाजी आव्हाड यांनी म्हटले आहे की,सदर शेतीच्या ठिकाणी गेल्या एक वर्षापूर्वी दहा हॉसपॉवरचा ट्रांसफार्मर वीज वितरण कंपनीने बसवलेला आहे. मात्र बसवल्यानंतर तो काही दिवसात जळाला या कालावधीमध्ये माझ्या शेती वरील वीज पंपाचा फक्त १०६ युनिट वापर झालेला आहे.परंतु याबाबत वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कळविल्यानंतर गेल्या एक वर्षापासून अंदाजे २४१८ युनिट वापर दाखवून ३४ हजार रुपये बिल आमच्या हातात देत आहे.ते बिल ही आम्ही भरण्यास तयार आहे.मात्र वापर झालेले रितसर बिल व नवीन ट्रांसफार्मर दिला जात नसल्यामुळे आम्ही वारंवार याबाबत मागणी केली असून कुठलीही दखल घेतली जात नाही.तर वापर फक्त ३ हाउसपॉवरचा बिल मात्र ४ हाउसपॉवरचे दिल्या जात असल्याने त्यांच्या गलथान कारभारामुळे माझ्यासारख्या गरीब शेतकऱ्यावर शेती पडीत ठेवण्याची वेळ आली आहे.तसेच याबाबत मनमाड येथील साहयक अभियंता यांच्याकडे रिडिंग प्रमाणे बिल मिळावे व नवीन ट्रान्सफार्मर देण्यात यावा अशी मागणी किसनाबाई शिवाजी आव्हाड यांनी केली आहे.
राशी भविष्य : ०७ ऑक्टोबर २०२५ – मंगळवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....







