Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

लोककवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी संविधान शाहिरी वर्ष म्हणून घोषित करा : प्रा.शरद शेजवळ

Apr 6, 2022

लोककवी वामनदादा कर्डक यांनी हयातभर आपल्या साहित्य शाहिरी कवनातून भारतीय संविधानिक मूल्य लोकशाही,समता,स्वातंत्र्य,न्याय, बंधुता,धर्मनिरपेक्षता,वैज्ञानिक दृष्टिकोन-अंधश्रद्धा निर्मूलन,राष्ट्रीय एकता व एकात्मता आपल्या लेखणीतून जनमाणसात रुजवली आहे. लोककवी वामनदादा कर्डक यांची हे वर्ष जन्मशताब्दी वर्ष आहे वामनदादांच्या हयातीत व कायदेशीर अनुमतीने आपण स्थापन केलेल्या लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान (फाउंडेशन) नाशिक महाराष्ट्रच्या सामाजिक न्याय विभाच्यावतीने “संविधान शाहिरी वर्ष” म्हणून साजरे केले जात आहे.
महाराष्ट्र शासन व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांनी राज्यभर विविध सांस्कृतिक सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करून लोककवी वामनदादा कर्डक यांचे जन्मशताब्दी वर्ष हे संविधान शाहिरी वर्ष म्हणून साजरे करून त्यांचे अप्रकाशित साहित्य प्रकाशित करावे या सह अन्य मागण्यांचे निवेदन लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठनाचे संस्थापक प्रा शरद शेजवळ यांनी बार्टी चे महासंचालक डॉ.धम्मज्योती गजभिये यांना दिले.यावेळी भरतीचे प्रज्ञा मोहिते,प्रतिष्ठानचे प्रफुल्ल ओवाहळ, सुनंदा गायकवाड आदी उपस्थित होते.
निवेदनातील महत्वपूर्ण मागण्या :

१) लोककवी वामनदादा कर्डक यांचे अप्रकाशित साहित्य “समग्र वामनदादा कर्डक” या नावाने आपल्या बार्टी या संस्थेच्या वतीने प्रकाशित
करावे त्याच प्रमाणे वामनदादा कर्डक यांचे साहित्य दृष्टिहीन बांधवांसाठी ब्रेल लिपी मध्ये करावे याचा प्रयोग पहिली आवृत्ती प्रकाशित करून आम्ही केला आहे तो आता पार्टीच्या माध्यमातून दुसऱ्या आवृत्तीच्या स्वरूपात करण्यात यावा.(संपादनाची जबाबदारी प्रतिष्ठान घेईल)

२) लोककवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी वर्ष हे संविधान शाहिरी व वर्ष म्हणून साजरे करावे.

३) महाराष्ट्रातील शाळा- महाविद्यालयातील युवक-युवती व शाहिरी कलावंतांचे बार्टी समता दूत सोबत सामाजिक प्रबोधन व संविधान कवन-शाहिरी गीत लेखन सादरीकरण कार्यशाळा आयोजित करण्यात याव्यात.

४) लोककवी वामनदादा कर्डक यांच्या साहित्य शाहिरी गीत रचनांवर परिसंवाद,चर्चासत्र साहित्य संमेलने मुलाखती आयोजित करण्यात यावेत.

५) लोककवी वामनदादा कर्डक यांच्या जीवनकार्यावर आधारित माहितीपट तयार करण्यात यावा.

६) शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी व खुल्या गटासाठी निबंध,वकृत्व,पथनाट्य स्पर्धा व राज्य स्तरावर आयोजित करण्यात यावी.
७) लोककवी वामनदादा कर्डक यांच्या सह अन्य गझलकार यांचे दुसरे आंबेडकरवादी गझल संमेलन घेण्यात यावे.
८) लोककवी वामनदादा कर्डक यांचे आंबेडकरी चळवळीतील योगदान व खुद्द बाबा साहेबांच्या सभा संमेलनातून गीत गायन गीतलेखन या अभूतपूर्व अलौकिक अशा योगदान लक्षात घेऊन त्यांचे कार्य महाराष्ट्रातील समाज सुधारक व प्रतिभावान साहित्यिक यांच्या योगदान समकक्ष यादीत समाविष्ट करण्यात यावे.त्या बद्दल आवश्यक तो शासकीय स्तरावरील पडताळा करून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्या साहित्य साहिरी संशोधन शिक्षण प्रशिक्षणाचे कार्य हाती घेण्यात यावे.

९) बार्टीने यापूर्वी महाराष्ट्रातील आंबेडकरी शाहीर कलावंत गायक लेखक कवी यांचा केलेला सर्वे अत्यंत महत्त्वाचा असून त्या सर्व कलाकारांना आपल्या या उपक्रमात सहभागी करून घ्यावे.
१०) लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान फाउंडेशन नाशिक ही संस्था वरील सर्व उपक्रम कार्य कृती करण्यासाठी तयार असून सदर कार्यक्रम हे डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे व लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान फाऊंडेशन नाशिक महाराष्ट्र असे संयुक्त विद्यमाने घेण्यात यावे.

अजून बातम्या वाचा..

बुधलवाडी येथे वाल्मीक आप्पा आंधळे व शहर उपप्रमुख धनंजय वाल्मीक आप्पा आंधळे यांच्या शिवसेना जन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

बुधलवाडी येथे वाल्मीक आप्पा आंधळे व शहर उपप्रमुख धनंजय वाल्मीक आप्पा आंधळे यांच्या शिवसेना जन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

मंगळवार दिनांक ४ जुलै रोजी आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या पत्नी सौ.अंजुमताई कांदे व युवासेनेचे...

read more
मनमाड शहरात आमदार आपल्या दारी महशिबिराची यशस्वी सांगता – तब्बल ३००० नागरिकांनी घेतला लाभ

मनमाड शहरात आमदार आपल्या दारी महशिबिराची यशस्वी सांगता – तब्बल ३००० नागरिकांनी घेतला लाभ

आमदार आपल्या दारी मनमाड शहरात आज आमदार आपल्या दारी ह्या शिबिराची सांगता बुधलवाडी येथील . मराठी...

read more
बघा व्हिडिओ – महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमेजवळील पलासनेर येथे डंपरचे ब्रेक निकामी झाल्याने झालेल्या अपघातात १२ जण ठार

बघा व्हिडिओ – महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमेजवळील पलासनेर येथे डंपरचे ब्रेक निकामी झाल्याने झालेल्या अपघातात १२ जण ठार

शिरपूर तालुक्यातील मध्य प्रदेश सीमेजवळील पलासनेर येथे मुंबई आग्रा महामार्गावर आज सकाळी ट्रकने अनेक...

read more
लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या ४३ व्या पुण्यतिथीनिमित्त मनमाड महाविद्यालयात वृक्षारोपण

लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या ४३ व्या पुण्यतिथीनिमित्त मनमाड महाविद्यालयात वृक्षारोपण

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदीर संचालित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात लोकनेते...

read more
कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल येथे गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल येथे गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल येथे गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली...

read more
गिरणा धरणावरील पायवाट सुरू करण्यासाठी नांदगाव तहसिल कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा

गिरणा धरणावरील पायवाट सुरू करण्यासाठी नांदगाव तहसिल कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा

नांदगाव सोमनाथ घोंगाणे गिरणा धरणावरील  नागरिकांना पायी जाण्यासाठी असलेली पायवाट रस्ता तब्बल एका...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]