loader image
[ays_poll id=7]

गोदावरी एक्सप्रेस सुरु करण्यास डॉ. भारती पवार यांनी मंजुरी मिळवली

Apr 7, 2022


मनमाड ते मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेने दिलासादायक निर्णय घेतला आहे. पंचवटी एक्सप्रेसला समांतर गोदावरी एक्सप्रेस सुरु करण्यास केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी काल मंजुरी मिळवली.


मुंबईला जाणारे व्यावसायिक, चाकरमाने व अन्य प्रवाशांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे. गेली दोन वर्षे ही गाडी सुरु करावी यासाठी प्रवासी संघटना, मुंबईला रोज ये जा करणारे चाकरमाने व नागरिक पाठपुरावा करीत होते. त्याबाबत राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले होते. ही गाडी सुरु झाल्यास अनेक प्रवाशांची सोय होणार आहे.
यासंदर्भात काल राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी रेल्वे भवन येथे मंत्र्यांची भेट घेतली. कोरोना लाटेत धोरण म्हणून अनेक रेल्वे प्रवासी गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. त्यातील काही लांब पल्ल्याच्या गाड्या अटींसह सुरु करण्यात आल्या. मात्र त्यात गोदावरी एक्सप्रेस सुरु झाली नव्हती. ही गाडी सुरु करणे आवश्यक असल्याची मागणी केल्यानंतर गोदावरी एक्सप्रेस सुरु करण्यास प्रशासनाने मान्यता दिली आहे. पुढील आठवड्यात त्याची कार्यवाही अपेक्षित आहे.

ही गाडी सकाळी पंचवटी एक्सप्रेस नंतर नऊला मनमाड येथून सुटेल. सायंकाळी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस येथून मनमाडकडे रवाना होईल. प्रायोगिक तत्वावर तीन महिने तीचा अभ्यास केला जाईल. पुरेसे प्रवासी व महसूल मिळाल्यास ती पुढे सुरु राहील असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नाशिक, मनमाडच्या प्रवाश्यांनी याबाबत या गाडीचा लाभ घ्यावा असे डॉ. पवार यांनी सांगितले.

गोदावरी एक्सप्रेस ही इंटरसिटी प्रवासी गाडी आहे. तीला मोठा प्रतिसाद असतो. मात्र रेल्वे प्रशासनाने धोरणात्मक निर्णय म्हणून तोट्यातील गाड्या बंद केल्या होत्या. त्यात केवळ आरक्षणाचे निकष लावल्याने ही गाडी बंद झाली होती. याबाबत प्रवासी संघटना सातत्याने पाठपुरावा करून या गाडीला रिझर्व्हेशन एैवजी सर्वसाधारण तिकीट विक्रीचा विचार करावा असा आग्रह धरला होता. आता ही गाडी सुरु होत असल्याने ती नियमितपणे सुरु राहील याची दक्षता आम्ही सर्व घेऊ, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश फोकणे यांनी सांगितले.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.