Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

गिर्यारोहणाची आवड जोपासत विठ्ठल गोरे यांनी साकारली जगातील सर्वात लहान “तोफ”

Apr 7, 2022

इतिहासाची आवड असल्याने तोफांची निर्मिती करत असताना काही लहान तोफांची निर्मिती केली. मग सुरू झाला छोट्या तोफेच्या निर्मितीचा प्रयत्न. त्याच प्रयत्नातून भारतातील सर्वात लहान तोफेची निर्मिती करण्यात आली. बहुधा ही जगातील सर्वात लहान तोफ आहे.
वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथील शेतकरी कुटुंबातील ‘विठ्ठल उत्तमराव गोरे’ ह्यांचा चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रात ‘शिव कृष्णा इंडस्ट्रीज’ नावाचा मशिनरी निर्माण करण्याचा कारखाना आहे. विठ्ठल गोरे यांना इतिहासाची आणि गडभ्रमंतीची आवड आहे. त्यातून त्यांनी दोन महिन्यांपूर्वी दोन फूट लांबीच्या तोफांची निर्मिती केली होती. त्यांना काही मित्रांनी लहान तोफ बनवता येईल का म्हणून विचारणा केली. त्यातून त्यांनी लहान दहा इंच लांबीच्या तोफ बनवल्या. त्याहून लहान तोफांची निर्मिती करण्याचा विचार करून त्यांनी केवळ पाऊण इंच लांबीची आणि विस ग्रॅम वजनाची एक अगदी लहान तोफ बनवली. मग सुरू झाला सर्वात लहान तोफ बनवायचा प्रयत्न. त्यावर विचार करत असताना त्यांनी भारतातील सर्वात लहान तोफ कोणती याची माहिती मिळवली. राजस्थानमध्ये जयपूर येथील कुंज बिहारी सोनी यांनी सन १९७१ मध्ये भारतातील सर्वात लहान तोफ बनवली होती. ती ११ मीमी लांब आणि ८ मिमी उंच आहे, तिचं वजन १.२ ग्रॅम आहे. तसेच जगातील सर्वात लहान उडवता येण्यासारखी तोफ हर्ने हल यांनी बनवलेली आहे. ती ६ मिलीमीटर लांब आणि ३ मिलीमीटर उंच आहे.
त्याहून लहान तोफ बनवण्यासाठी विठ्ठल गोरे यांनी सूक्ष्म हत्यारे वापरून तसेच कोणत्याही CNC मशीनचा उपयोग न करता, साधारण लेथ मशीनरीचा वापर करत, एक अतिशय लहान तोफ बनवली. तिची लांबी फक्त ५ मिमी, रुंदी ३.५ मिमी, उंची २.७ मिमी आहे, तर वजन केवळ १४० मिलिग्रॅम आहे. तोफेचं बॅरल केवळ ०.९६ मिलीमीटर व्यासाचे आहे. ती उडवता येऊ शकेल अशी रचना केलेली आहे.त्यांनी यासाठी पितळ तसेच तांबे हे धातू वापरले. या तोफेची नोंद लिम्का बुक मध्ये करण्याचा त्यांचा मानस आहे. या कामात त्यांना योगेश भोसले यांचं सहकार्य मिळालं.
आपल्या कामासोबत छंदाचीही जोपासना करत आनंदी राहता येते. तोफांसोबतच अनेक लहान लहान वस्तूंची निर्मिती विठ्ठल गोरे यांनी केलेली आहे. त्यात कट्यार, वाघनखे, जातं, तसेच शेतीची औजारे यांचीही निर्मिती त्यांनी केलेली आहे.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – मनमाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शानदार लोकार्पण – मनमाड शहरात भव्य दिव्य भीमसृष्टी उभारणार – आमदार कांदे

बघा व्हिडिओ – मनमाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शानदार लोकार्पण – मनमाड शहरात भव्य दिव्य भीमसृष्टी उभारणार – आमदार कांदे

आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळेच मी हे सर्व काही करू शकलो असेच आशीर्वाद कायम राहू द्या मी आपणास...

read more
लोकसभा निवडणुकीपूर्वी सूचना शक्य – रेल्वे प्रवाशांनो ५०० ग्राम पेक्षा जास्त सोन्याचे दागिने मिळाल्यास होणार जप्तीची कारवाई?

लोकसभा निवडणुकीपूर्वी सूचना शक्य – रेल्वे प्रवाशांनो ५०० ग्राम पेक्षा जास्त सोन्याचे दागिने मिळाल्यास होणार जप्तीची कारवाई?

  रेल्वेत प्रति प्रवासी 500 ग्रॅम व त्यापेक्षा जास्त दागिन्यांची तपासणी केली जाऊ शकते या...

read more
मनमाड करांची चार दशकांची मागणी आज होणार पूर्ण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे आज लोकार्पण

मनमाड करांची चार दशकांची मागणी आज होणार पूर्ण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे आज लोकार्पण

मनमाड : तब्बल ४० वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मनमाडकर जनतेचे स्वप्न पूर्ण होत असून आमदार सुहास कांदे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]