Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

भाग क्र. 4 डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील भोगवटदार वर्ग 2 उतारे मिळण्याकरीता प्रत्यक्ष मोजणीला सुरुवात

Apr 9, 2022

प्रभाग क्र. 4 डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक विभागातील शासकीय जागेवरील निवासी अतिक्रमण कायम करण्यासाठी वेळोवेळी भुमीअभिलेख कार्यालय व नगर पालिका प्रशासनाशी संपर्क साधून, प्रसंगी आंदोलन करून अखेर या कामाला यश आले असून प्रत्यक्ष मोजणीला सुरुवात झाली आहे. परिसरातील शासकीय जागेवरील निवासी अतिक्रमणे कायम करुन भोगवटदार वर्ग 2 चे उतारे मिळून पंतप्रधान घरकुल योजनेमध्ये सामावून घेण्यासाठी दि.7/4/2022 रोजी 8/4/2022 रोजी भुमी अभिलेख कार्यालय व मनमाड नगर पालिकेच्या वतीने दि. 7/4/2022 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जागेची मोजणीकरण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा उपस्थितीत झाली त्याप्रसंगी मनमाड नगर पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन पटेल व संपूर्ण भुमी अभिलेख प्रशासन उपस्थित होते त्याप्रसंगी नगरसेवक गंगादादा त्रिभुवन, संजय टेलर, बाळू गवळे, सुभाष पवार, रविंद्र पगारे, शैलेश जगताप, बॉबी पवार, गोटू भालेराव, आकाश निकम, सोनु गवळे आदींसह वार्डातील रहिवाशी उपस्थित होते. यावेळी मुख्याधिकारी व भुमिलेख अधिकारी व उपस्थित सर्व कर्मचारी वर्गाचे आभार रिपाइं तालुका युवक अध्यक्ष गुरुकुमार निकाळे यांनी व्यक्त केले.

मोजणी सुरु झाली तरी येथील रहिवाशांना प्रत्यक्ष भोगवटादार वर्ग 2 चे उतारे प्रत्यक्ष मिळण्यासाठी अजून विविध शासकीय विभागांच्य परवानग्या व इतर कामे बाकी असून त्यासर्व बाबींचा पाठपुरावा करुन लवकरच रहिवाशांना भोगवटदार वर्ग 2 चे उतारे देऊन त्यांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळणार असून त्यांचे हक्काचे चांगले घर निर्माण होणार आहे. या चांगल्या कामामध्ये कुणीही राजकारण न करता निस्वार्थपणे रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर उभे रहाण्याकरीता आपले योगदान द्यावे असे आवाहन गुरुकुमार निकाळे यांनी केले आहे.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव पाणी प्रश्न गंभीर तिसऱ्यांदा रास्ता रोको… तिन आठवड्यातुन एकदा  पाणी…? ग्रामीण भागात हीच अवस्था

नांदगाव पाणी प्रश्न गंभीर तिसऱ्यांदा रास्ता रोको… तिन आठवड्यातुन एकदा पाणी…? ग्रामीण भागात हीच अवस्था

नांदगाव : मारुती जगधने नांदगाव शहराचा पाणी प्रश्न जटील बनत चालला असून एकाच ठिकाणी त्याच मार्गावर...

read more
शिंदे समिती रद्द करून कुणबी मराठा प्रमाणपत्र वितऱणाला स्थगिती देण्याची नांदगाव सकल ओबीसी समाजाची मागणी

शिंदे समिती रद्द करून कुणबी मराठा प्रमाणपत्र वितऱणाला स्थगिती देण्याची नांदगाव सकल ओबीसी समाजाची मागणी

राज्यातील ओबीसी,भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील आरक्षण वाचवणे बाबत नांदगाव सकल ओबीसी,भटक्या...

read more
आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून माणिकपुंज धरणावरून नव्या जलवाहिनी साठी दोन कोटी रुपये मंजूर

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून माणिकपुंज धरणावरून नव्या जलवाहिनी साठी दोन कोटी रुपये मंजूर

माणिकपुंज धरण ते नांदगाव येथील जलकुंभ येथे होणाऱ्या पाणीपुरवठा साठीची जलवाहिनी सतत फुटत असल्यामुळे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]