मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांच्या अध्यक्षतेखाली “परीक्षा पे चर्चा” या विषयावर श्री अविनाश पारखे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.
श्री अविनाश पारखे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना इयत्ता बारावी बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी परीक्षेची अनावश्यक भीती घेऊ नये, तसेच परीक्षेच्या काळामध्ये योग्य आहार, व्यायाम, मेडिटेशन करावे. अभ्यासाचे योग्य नियोजन केल्यास मनावर दडपण येत नाही असे मनोगत केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेस सामोरे जाताना मेहनत व वेळेचे नियोजन यांची योग्य सांगड घालून परीक्षेला सामोरे गेले तर यश हमखास मिळते असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा दिलीप कातकडे, प्रा. आय. एम खान, प्रा. व्हीं ए दासनूर, महाविद्यालयातील प्राध्यापक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा व्ही आर फंड यांनी केले. सूत्रसंचालन प्रा अमोल देसले व आभार प्रा सुनील बच्छाव यांनी मानले.

राशी भविष्य : ११ ऑक्टोबर २०२५ – शनिवार
मेष : भाग्यकारक घटना घडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. वृषभ : काहींना...