मेष :- कर्ज प्रकरणे सध्या टाळावीत. जोडीदाराशी हितगुज करता येईल. कामाचा योग्य मोबदला मिळेल.
वृषभ :- व्यवसायातून चांगला लाभ होईल. मनातील इच्छा पूर्ण करता येईल. गैरसमजाला बळी पडू नका.
मिथुन :- कामात वारंवार बदल करू नका. वेळ व काम यांचे गणित जुळवावे लागेल.
कर्क :- धार्मिक गोष्टींची आवड पूर्ण कराल. गैरसमजाला खतपाणी घालू नका.
सिंह :- अचानक धनलाभ संभवतो. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. मनमोकळ्या गप्पा होतील.
कन्या :- वैवाहिक सौख्यात भर पडेल. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो.
तूळ :- क्षुल्लक गोष्टींवरून चिडचिड करू नका. हातातील अधिकाराची जाणीव ठेवा.
वृश्चिक :- स्वच्छंदीपणे वागाल. जुगारातून लाभ संभवतो. तुमच्या कार्यक्षेत्रात वाढ होईल.
धनू :- घराचे सुशोभीकरण काढाल. प्रवासाचा आनंद घेता येईल. मानसिक शांतता लाभेल.
मकर :- संयमी विचार करावा. कलेचे कौतुक केले जाईल. हातून एखादे सत्कार्य घडेल.
कुंभ :- बौद्धिक दृष्टीकोन ठेवाल. अति श्रमामुळे थकवा जाणवेल.
मीन :- तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडेल. जीवनाकडे आनंदी दृष्टीकोनातून पहाल.




