Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

“गाथा भिमाची” शाहिरी पोवड्यांनी जिंकली मनमाडकर रसिकांची मने !

Apr 12, 2022

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पराक्रमांचे, कार्यकर्तृत्वाचे पोवाडे आपल्या विशेष शैलीत सादर करून शाहिर निशांत शेख आणि शाहीर प्रसाद विभूते यांनी महापुरुषांचे विचार आपल्या शाहिरीबाज गीतातून प्रबोधन करत भीमोत्सवाच्या गाथा भिमाची या कार्यक्रमाच्या वातावरणात स्फूर्ती निर्माण केली

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मनमाड शहरात ११ एप्रिल ते १६ एप्रिल पर्यंत भरगच्च प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्या अंतर्गत (ता ११ रोजी सायंकाळी) येथील एकात्मता चौकात राष्ट्रपती पुरस्कार विजेते महाराष्ट्राचे प्रसिद्ध शाहिर आदिनाथ बापूराव विभूते यांच्या शाहीर प्रसाद विभूते आणि शाहीर निशांत शेख यांचा ‘गाथा भिमाची’ हा शाहिरी पोवाड्यांचा कार्यक्रम संपन्न झाला भीमोत्सवतर्फे एक आगळीवेगळी वैचारिक सांस्कृतिक विचारांची डॉ आंबेडकरांची जयंती साजरी केली जात असून सहा दिवस मनमाडकरांना विविध कार्यक्रमांची मेजवानी देत आहे हातात डफ धरलेल्या व डोक्यावर फेटा बांधलेल्या दोन्ही शाहिरांनी ललकारी ठोकत महाराष्ट्राच्या लोककलेची ओळख करून दिली लोककलेचं संवर्धन आणि बाबासाहेबांचं गुणगान असा दुहेरी बाज सादर करत शाहिरांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील प्रसंग ताकदीने सादर केला आवेशपूर्ण मुद्राभिनयाने व भारदस्त आवाजामुळे या पोवाड्याला वेळोवेळी टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला तर शाहीर प्रसाद विभूते यांनी शाहीर अण्णाभाऊ साठे यांची माझी मैना गावावर राहीली ही छक्कड गाऊन रत्नाची खाण असणा-या मैनेचे वर्णन आपल्या शैलीने खुमासदारपणे सादर केले
भिमाई च्या वासराचा, रामजीच्या लेकराचा, पायगुण असा भारीभारी, जागा केला जगजेठी गा .., जग बदल घालुनी घाव सांगूंनी गेले मला भीमराव .., ओव्या, गीते, कवने सादर केली तर विविध पात्र उभारून समाजातील अंधश्रद्धेवर कडाडून असूड ओढले तर अशा प्रबोधनात्मक विचार मांडत तथागत गौतम बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आधुनिक युगातही किती महत्वाचे आहे असा प्रबोधनात्मक विचार मांडत जनजागृती केली यावेळी शाहिरी कलापथकाला मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले भीमोत्सव  चे राजेंद्र पगारे, दिनकर धिवर, अमोल खरे, अनिल निरभवणे, प्रा डॉ जे वाय इंगळे, संजय कटारे, रवी गायकवाड, निलेश वाघ, सतिष केदारे, सुनील मायर, मनोज ठोंबरे यांच्यासह मोठ्या संख्येने रसिकजन उपस्थित होते  

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – मनमाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शानदार लोकार्पण – मनमाड शहरात भव्य दिव्य भीमसृष्टी उभारणार – आमदार कांदे

बघा व्हिडिओ – मनमाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शानदार लोकार्पण – मनमाड शहरात भव्य दिव्य भीमसृष्टी उभारणार – आमदार कांदे

आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळेच मी हे सर्व काही करू शकलो असेच आशीर्वाद कायम राहू द्या मी आपणास...

read more
लोकसभा निवडणुकीपूर्वी सूचना शक्य – रेल्वे प्रवाशांनो ५०० ग्राम पेक्षा जास्त सोन्याचे दागिने मिळाल्यास होणार जप्तीची कारवाई?

लोकसभा निवडणुकीपूर्वी सूचना शक्य – रेल्वे प्रवाशांनो ५०० ग्राम पेक्षा जास्त सोन्याचे दागिने मिळाल्यास होणार जप्तीची कारवाई?

  रेल्वेत प्रति प्रवासी 500 ग्रॅम व त्यापेक्षा जास्त दागिन्यांची तपासणी केली जाऊ शकते या...

read more
मनमाड करांची चार दशकांची मागणी आज होणार पूर्ण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे आज लोकार्पण

मनमाड करांची चार दशकांची मागणी आज होणार पूर्ण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे आज लोकार्पण

मनमाड : तब्बल ४० वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मनमाडकर जनतेचे स्वप्न पूर्ण होत असून आमदार सुहास कांदे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]