loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य :१३ एप्रिल २०२२

Apr 13, 2022


मेष :- तुमचा व्यवहार शालीन राहील. गोष्टी मनाप्रमाणे घडवून आणाल. न आवडणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. जोडीदाराला खुश कराल. आज तुमचा चांगला प्रभाव पडेल.

वृषभ :- अचानक खर्च समोर येऊ शकतात. आपल्या मतावर ठाम राहावे.

मिथुन :- केलेल्या गुंतवणुकीतून चांगला लाभ होईल. भावंडांसोबतच्या नात्यात सुधारणा होईल.

कर्क :- कामाच्या ठिकाणी प्रगती कराल. घरातील कामासाठी वेळ काढावा लागेल.

सिंह :- बिघडलेल्या गोष्टी संतुलित करता येतील. आज मनात करुणा निर्माण होईल.

कन्या :- आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका. काही अनपेक्षित गोष्टी घडून येतील.

तूळ :- लहान व्यावसायिकांना चांगला नफा कमावता येईल. तुमच्या ओळखीत वाढ होईल.

वृश्चिक :- कोणाकडूनही फार अपेक्षा ठेऊ नका. हाताखालील लोकांवर विसंबून राहू नका.

धनू :- कौटुंबिक जीवनात सुखद अनुभव येतील. रेस, सट्टा यातून लाभ संभवतो.

मकर :- वाहन विषयक कामे पार पडतील. मनातील विचार घरातील लोकांसमोर मांडाल.

कुंभ :- घाई गडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका. चौकसपणे सर्व गोष्टींकडे पहावे.

मीन :- सर्वांची आपुलकीने काळजी घ्याल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल.


अजून बातम्या वाचा..

.