Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

चांदवड पॉलिटेक्निक तर्फे पाणपोईचे उद्घाटन

Apr 13, 2022

रखरखत्या उन्हात तहानलेल्याची तृष्णा भागविन्या एवढा धर्म नाही म्हणूनच उन्हाळा आला की तहानलेल्या जिवांचा पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध नसल्यामुळे जीव कासावीस होतो. आमच्या पॉलीटेक्निक चे मार्गदर्शक व समन्वयक माननीय श्री अरविंद जी भन्साळी व माननीय श्री राजकुमारजी बंब यांच्या संकल्पनेतून व समाजासाठी योगदान करण्याच्या भावनेतून समाज उपयोगी उपक्रम राबवताना आपल्या पॉलीटेक्निक ने गणुर चौफुली येथे बाजारासाठी येणारे आजुबाजुचा खेड्या वरून येणारे लोक यांची तृष्णा भागविण्यासाठी पाणपोई सुरू करण्याचा निश्चय केला व आज दिनांक 12 एप्रिल रोजी चांदवड येथील ज्येष्ठ समाजसेवक माननीय श्री अशोक काका व्यवहारे श्री बाळासाहेब शेळके, श्री हिरामण शेळके, श्री साहेबराव कुवर ,श्री एन झेड जैन सर, श्री टी पी निकम सर ,श्री अशोक काका डुंगरवाल या मान्यवरांच्या उपस्थितीत पाणपोई उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले*. या पाणपोई उभारण्यासाठी पॉलिटेक्निक येथील विद्यार्थी सुजल देशमुख, अभय अहिरे, विकास कापसे ,वैभव कापसे तसेच सौ एम एम वाघ मॅडम वर्कशॉपचे स्टाफ श्री नानकर सर ,श्री आर सी कुवर, ए आर पठाडे ,बीएस कुवर, के पी वाघ एस एन निकम ,ज्ञानेश्वर गांगुर्डे आदी सहकाऱ्यांनी योगदान दिले, या समाज उपयोगी उपक्रमासाठी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. विशाल वानखेडे सर उपप्राचार्य श्री एस एच गौडा सर विभाग प्रमुख श्री डी व्ही लोहार कुमारी ए एस चोरडिया श्री एन आर ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.
विश्वस्त समितीचे अध्यक्ष मा.श्री बेबीलालजी संचेती व विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष मा. श्री दिनेशजी लोढा, मानद सचिव मा.श्री जवाहरलालजी आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष मा.श्री अजीतकुमारजी सुराणा, प्रबंध समितीचे उपाध्यक्ष आणि तंत्रनिकेतनाचे समन्वयक मा. श्री अरविंदकुमारजी भन्साळी, सह मानद सचिव मा.श्री. झुंबरलालजी भंडारी, व तंत्रनिकेतनाचे मुख्य समन्वयक तथा प्रबंध समिती सदस्य मा. श्री राजेंद्रकुमारजी बंब यांनी या आयोजनाबद्दल संबंधितांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या राष्ट्रीय सेवा...

read more
मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा व गणेश उत्सवा तील प्रथम मानाचा गणपती म्हणून...

read more
श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

  नाशिक येथे मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र...

read more
बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

या गणेशोत्सवात लाडक्या श्रीगणेशाच्या आगमनाने दहा दिवस सर्वत्र प्रसन्नमय वातावरण झाले. बाप्पाच्या...

read more
बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]